Corona virus : पिंपरीत कोरोनामुळे सहावा बळी; शहरात पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ७१ 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 06:19 PM2020-05-06T18:19:49+5:302020-05-06T18:22:15+5:30

दिवसभरात दहा आठ नवीन रूग्ण सापडले

Corona virus : corona's six death in pimpri chichwad; number of patient on 71 in city | Corona virus : पिंपरीत कोरोनामुळे सहावा बळी; शहरात पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ७१ 

Corona virus : पिंपरीत कोरोनामुळे सहावा बळी; शहरात पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ७१ 

Next
ठळक मुद्देतरूण लहान मुलांमध्ये वाढतोय कोरोना

पिंपरी :औद्योगिकनगरीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दिवसभरात दहा आठ नवीन रूग्ण सापडले आहेत. कोरोनाने सहावा बळी घेतला असून मृत महिला ही पुण्यातील शिवाजीनगरची आहे. नवीन रूग्णांमध्ये तरूणांची संख्या अधिक आहे. शहरात पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ७१ गेली आहे. आजपर्यंत १४२ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. शहरातील आठ आणि पुण्यातील दोन जणांचा समावेश आहे.
पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत कोरोनाचा विळखा घट्ट होऊ लागला आहे. पिंपरीतील वायसीएम आणि भोसरीतील महापालिकेच्या रूग्णालयात कोरोनाचे रूग्ण उपचार घेत आहेत. संशयित रूग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. पुण्यापेक्षा पिंपरीत कोरोनाचा वेग काहीसा कमी आहे. शहरातील २१ ठिकाणी कंटेन्मेंट झोन असून शहराचा नव्वद टक्के भाग कंटेन्मेट मुक्त झाला असून केवळ दहा टक्के क्षेत्रात कंटन्मेंट झोन आहे.
मंगळवारी २०५  रूग्णांना रूग्णालयात दाखल केले आहेत. त्यांच्या घश्यातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील एनआयव्हीमध्ये पाठविण्यात आले आहेत. त्याचे अहवाल बुधवारी  सकाळी आले असून त्यात दहाजणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात सात पुरूष आणि तीन महिलांचा समावेश आहे.
 पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ७१ असून त्यातील १० रूग्ण पुण्याबाहेरील दहा  असून महापालिकेच्या रूग्णालयात उपचार घेत आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये परंतु शहराबाहेरील रूग्णालयात आठ जण उपचार घेत आहे. महापालिका परिसरातील रूग्ण पिंपरीतील वायसीएम रूग्णालय आणि भोसरीतील महापालिका रूग्णालयात उपचार घेत आहे.  तसेच शहरातील ६० आणि पुण्यातील दोन असे एकुण ६२ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
बुधवारी पॉझिटिव्ह आलेले आठ रूग्ण शहरातील असून मोशी, पिंपळेगुरव, चिंचवड येथील रहिवाशी आहेत. तर दोन रूग्ण पुण्यातील आहेत. त्यात सात पुरूष आणि तीन महिलांचा समावेश आहे. पुरूषांमध्ये एकाचे वय ६ वर्षे  दुसºयाचे वय २१, तिसºयाचे वय २२, चौथ्याचे वय २४, पाचव्याचे वय २८ वर्ष, सहाव्याचे ३०, सातव्याचे ५० वर्षे आहेत. तर महिलांमध्ये एकीचे वय २५, दुसरीचे वय २८ वर्षे आहे.
शिवाजीनगर येथील एक महिला पिंपरी-चिंचवडमध्ये उपचार घेत होती. तिचा मृत्यू बुधवारी झाला आहे. कोरोनामुळे शहरातील तीन आणि शहराबाहेरील तीन अशा सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
 

Web Title: Corona virus : corona's six death in pimpri chichwad; number of patient on 71 in city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.