Corona virus : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिघी, चिखली, खराळवाडी, थेरगाव परिसर 'सील'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 08:40 PM2020-04-08T20:40:53+5:302020-04-08T20:42:22+5:30

शहरातील या भागांमध्ये पुढील काही दिवस नागरिकांच्या हालचालींवर, बाहेर फिरणाऱ्यांवर मर्यादा आणणे आवश्यक

Corona virus : Dighi, Chikhali, Kharalwadi, Thergaon area 'seal ' to prevent the spread of corona | Corona virus : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिघी, चिखली, खराळवाडी, थेरगाव परिसर 'सील'

Corona virus : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिघी, चिखली, खराळवाडी, थेरगाव परिसर 'सील'

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनामुळे संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंध व नियंत्रण याबाबतचे आदेश लागू करण्याची आवश्यकता पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरीतील खराळवाडी, दिघी, चिखली, थेरगाव परिसर बुधवारी मध्यरात्रीपासून बंदकोरोना विषाणूंमुळे पिंपरी-चिंचवड शहरात आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण

पिंपरी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून महापालिका प्रशासनाने कोरोनाला रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरीतील खराळवाडी, दिघी, चिखली, थेरगाव परिसर बुधवारी मध्यरात्रीपासून बंद केला आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.
चीनमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर महाराष्ट्रात आणि पिंपरी-चिंचवड परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोनाचे रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात आढळून येत आहेत. सध्या रुग्णांची संख्या २१ वर पोहोचली आहे. तसेच संशयितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे संचारबंदी जारी केली आहे. तसेच रुग्ण आढळलेले भाग सील करण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरीतील खराळवाडी, दिघी, चिखली, थेरगाव परिसर बुधवारी मध्यरात्रीपासून बंद केला आहे.
'महाराष्ट्र कोविड' उपाययोजना नियमानुसार क्षेत्र प्रतिबंधित करणे,  क्षेत्रातील नागरिकांचे आगमन व प्रस्थान प्रतिबंधित करणे, क्षेत्रातून वाहनांचे आगमन प्रतिबंधित करणे. तसेच भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ प्रमाणे संभाव्य होणाऱ्या  कोरोना विषाणूंच्या प्रादुभार्वामुळे मानवी आरोग्याला व जीविताला धोका निर्माण होण्याचा संभव आहे. याकरिता कोरोना विषाणूंमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंध व नियंत्रण याबाबतचे आदेश लागू करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ (एपिडमिक अ‍ॅक्ट) मधील तरतुदींनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील हा भाग सील केला आहे.
 

तोंडाला मास्क बांधणे अनिवार्य
या परिसरांच्या हद्दीमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी करण्यात येत आहे.  सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क अथवा घरगुती स्वच्छ धुतलेला कापडी रुमाल लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच आदेशामधील निबंर्धातून जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या व्यक्तींना, कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम करणारे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कर्मचारी, वाहने व शासकीय व सेवा देण्यात येणाऱ्या वाहनांना वगळण्यात आले आहे. नागरिकांनी सहकार्य करावे,असे आवाहन आयुक्त हर्डीकर यांनी केले आहे.
 

* प्रतिबंधात्मक उपाययोजना
कोरोना विषाणूंमुळे पिंपरी-चिंचवड शहरात आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणास्तव  महापालिका क्षेत्रात आपत्कालीन उपाययोजना लागू करण्याची व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

* हा आहे सील केलेला भाग : रस्ते करणार बंद
चिखलीतील घरकुल रेसिडेन्सी-बिल्डिंग क्र. ए १ ते २० चिखली, (पवार इंडस्ट्रीयल परिसर-नेवाळे वस्ती)
जामा मस्जिद, खराळवाडी या भोवतीचा परिसर, पिंपरी (गिरमे हॉस्पिटल-अग्रेसन लायब्ररी-कृष्णा ट्रेडर्स-चैताली पार्क हौसिंग सोसायटी-खराळ आई गार्डन-ओम हॉस्पिटल-ओरियंटल बँक-सीटी प्राईड हॉटेल-क्रिस्टल कोर्ट हॉटेल-गिरमे हॉस्पिटल.
कमलराज बालाजी रेसिडन्सी, रोडे हॉस्पिटलजवळ, दिघी, भोसरी (रोडे हॉस्पिटल-एसव्हीएस कॉम्प्युटर-स्वरा गिफ्ट शॉपी-साई मंदिर रोड-अनुष्का ऑप्टीकल शॉप-रोडे हॉस्पिटल.
शिवतीर्थनगर, पडवळनगर थेरगाव (शिरोळे क्लिनिक-गणेश मंदिर-निदान क्लिनिक-कीर्ती मेडिकल-रेहमानिया मस्जिद-ऑर्कीड हॉस्पिटल-अशोका सोसायटी रोडवरील गणपती मंदिर ते शिरोळे क्लिनिक.

* पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या विचारात घेता, शहरात रुणांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांचे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने शहरातील या भागांमध्ये पुढील काही दिवस नागरिकांच्या हालचालींवर, बाहेर फिरणाऱ्यांवर मर्यादा आणणे आवश्यक आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरीतील खराळवाडी, दिघी, चिखली, थेरगाव परिसर बुधवारी मध्यरात्रीपासून बंद केला आहे. - श्रावण हर्डीकर, आयुक्त

Web Title: Corona virus : Dighi, Chikhali, Kharalwadi, Thergaon area 'seal ' to prevent the spread of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.