Corona virus : मावळ तालुक्यातील ३०९२ लोकांना होमक्वारंटाईनचे आदेश; ओपीडी व रूग्णालये देखील बंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 09:53 PM2020-03-27T21:53:22+5:302020-03-27T21:53:52+5:30

मुंबई, पुणे, पिपरी चिंचवड व अन्य शहरातून मावळ तालुक्यात वास्तव्यास आलेल्या लोकांचा समावेश

Corona virus : Home Quarantine Order for 3092 people in Maval taluka; OPD and hospitals also closed | Corona virus : मावळ तालुक्यातील ३०९२ लोकांना होमक्वारंटाईनचे आदेश; ओपीडी व रूग्णालये देखील बंद 

Corona virus : मावळ तालुक्यातील ३०९२ लोकांना होमक्वारंटाईनचे आदेश; ओपीडी व रूग्णालये देखील बंद 

Next
ठळक मुद्देकोरोनाच्या भीतीने मावळ परिसरातील डॉक्टरांनी आपली खासगी ओपीडी व रुग्णालये बंद

मावळ : राज्यासह पुणे ,पिपरी चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांत कोरोना विषाणूचे लागण झालेले रुग्ण आढळून आले. त्यानंतर जिल्हा प्रशासन,आरोग्य विभाग , डॉक्टर,कर्मचारी सतर्क झाले. शहरी व ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून विविध पावले उचलली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई,पुणे व इतर शहरातून मावळ तालुक्यात आलेल्या ३०९२ लोकांची नोंदणी करून त्यांच्या हातावर शिक्के मारले असून त्यांना १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, यासोबतच कोरोनाच्या भीतीने मावळ परिसरातील डॉक्टरांनी आपली खासगी ओपीडी व रुग्णालये बंद ठेवले असल्याचे निदर्शनास आले आहे. 
तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर चंद्रकांत लोहारे यांनी दिलेल्या माहितीनुसार,परदेश दौरा करून आलेले ९६ व त्यांच्या सहवासातील १२२ असे एकूण २१८ जणांना यापूर्वीच आरोग्य खात्याच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. शासनाने जे नियम दिलेत त्याचे पालक करावे, असे आवाहन करतानाच त्यांनी मावळ तालुक्यात आत्तापर्यंत एकही रूग्ण आढळला नसल्याचे सांगितले. 

वडगाव मावळ परिसरात कोरोनाच्या खासगी दवाखाने व ओपीडी बंद 
      कोरोनाच्या भीतीने वैद्यकीय सेवा न देता मावळ तालुक्यातील रूग्णालय बंद ठेवून घरी बसणाऱ्या डॉक्टर्स, वैद्यकीय व्यावसायिकांवर कारवाई करून नोंदणी रद्द करावी असा आदेश विगागीय आयुक्त डॉक्टर दिपक म्हैसेकर यांनी दिला आहे.  अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर चंद्रकांत लोहारे व  यांनी दिली.
कोरोना विषाणू हा संसर्गजन्य स्वरूपाचा असलेने तातडीने खबरदारीच्या प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे आवश्यक आहे. असे असताना काही डॉक्टर्स,वैद्यकीय व्यावसायिक या करोनाच्या भीतीने वैद्यकीय सेवा देत नसल्याने तसेच ओपीडी व रूग्णालय बंद ठेवत असल्याचे निदर्शनास येत असल्याने उल्लंघन करणा-या डॉक्टर्स, वैद्यकीय व्यावसायिकांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व महाराष्ट्र कोविड उपयोजना नियम २०२० या अनुषंगाने कारवाई करून त्यांची नोंदणी रद्द करावी असा आदेश विगागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.तसेच ओपीडी व रूग्णालय सुरळीत सुरू राहतील याची दक्षता घ्यावी असे आवाहन केले आहे. 

मावळात होणार कारवाई..?

मावळात तालुक्यात  वडगाव, तळेगाव, कामशेत, लोणावळा, देहूरोड या चार प्रमुख शहरांसह  खेड्यापाड्यात खासगी डॉक्टरांची संख्या अधिक आहे. अनेकांनी आपली स्वताची रूग्णालय सुरू केली आहेत. तालुक्यात सुमारे २२५ ते २३० खासगी डॉक्टर आहेत. कोरोनाच्या भीतीने काही डॉक्टरांनी ओपीडी व रूग्णालये बंद ठेवली आहेत.

Web Title: Corona virus : Home Quarantine Order for 3092 people in Maval taluka; OPD and hospitals also closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.