Corona Virus News : पिंपरी शहरात रविवारी नवे १०९ कोरोनाबाधित : ९६ जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 11:31 AM2021-01-04T11:31:17+5:302021-01-04T11:32:45+5:30
शहरात रविवारी २२३९ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले.
पिंपरी : कोरोना विषाणूंचा संसर्ग कमी होत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण कमी संख्येने आढळत आहेत. शहरात रविवारी १०९ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९६,९६० झाली. तर दिवसभरात ९६ जण कोरोनामुक्त झाले. तसेच कोरोनाचा एकही रुग्ण दगावला नाही.
शहरात रविवारी २२३९ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. तसेच दिवसभरात १८१३ जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले. महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या आतापर्यंत १७५९ तर महापालिका हद्दीबाहेरील ७३३ रुग्ण शहरात उपचारादरम्यान दगावले आहेत. रविवारी दिवसभरात ११८३ जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून २२२६ जणांना घरी सोडण्यात आले. तर ६६३ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील ६४ रुग्ण शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. महापालिका हद्दीबाहेरील ७४२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर महापालिका हद्दीतील ९३५७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीतील रहिवासी असलेले कोरोना पॉझिटिव्ह ४८ रुग्ण शहराबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.
शहरात १५४६ सक्रिय रुग्ण
कोरोना पाॅझिटिव्ह असलेले ६६३ सक्रीय रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर ८८३ रुग्णांचे गृहविलगीकरण करण्यात आले आहे. असे एकूण १५४६ सक्रीय रुग्ण शहरात आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांपेक्षा गृहविलगीकरण केलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.