Corona Virus News : पिंपरीत शनिवारी नवे १६७ रुग्ण; १५८ जण कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2021 08:26 PM2021-01-09T20:26:43+5:302021-01-09T20:26:57+5:30
शनिवारी दिवसभरात २,८४३ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल
पिंपरी : कोरोना विषाणूंचा संसर्ग कमी होत असला तरी धोका कायम आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत दररोज भर पडतच आहे. शहरात शनिवारी १६७ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९७,७९० झाली. तर दिवसभरात १५८ जण कोरोनामुक्त झाले.
शहरात शनिवारी कोरोनाचे पाच रुग्ण दगावले. यात महापालिका हद्दीतील चार तर शहराबाहेरील एका रुग्णाचा समावेश आहे. महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या आतापर्यंत १,७७२ तर महापालिका हद्दीबाहेरील ७३६ रुग्ण शहरात उपचारादरम्यान दगावले आहेत. शनिवारी दिवसभरात २,८४३ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. तसेच दिवसभरात १,८८९ जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले. ३,०९४ जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून २,८३३ जणांना घरी सोडण्यात आले. तर ५७३ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील ६९ रुग्ण शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. महापालिका हद्दीबाहेरील ७४५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर महापालिका हद्दीतील ९४३१६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीतील रहिवासी असलेले कोरोना पॉझिटिव्ह ८८ रुग्ण शहराबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.
शहरात १७०२ सक्रिय रुग्ण
कोरोना पॉझिटिव्ह असलेले ५७३ सक्रीय रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर १,१२९ रुग्णांचे गृहविलगीकरण करण्यात आले आहे. असे एकूण १,७०२ सक्रीय रुग्ण शहरात आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांपेक्षा गृहविलगीकरण केलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.
युके स्ट्रेनचा एक अहवाल अद्याप प्रलंबित
इंग्लंडहून परतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील २६८ प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी सात प्रवाशांचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे युके स्ट्रेन करीता जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठविले होते. त्यातील तीन अहवाल नकारात्मक आहे. तर तीन अहवाल पाॅझिटिव्ह आले असून तिघांची प्रकृती चांगली आहे. तसेच एक अहवाल प्रलंबित आहे.