Corona virus news : पिंपरी-चिंचवडमधील कोरोना रुग्ण संख्या ८० हजारांच्या उंबरठ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2020 12:13 PM2020-10-04T12:13:03+5:302020-10-04T12:14:08+5:30
शनिवारी दिवसभरात ८१६ कोरोनामुक्त : नवे ५९८ रुग्ण
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोनाचा विळखा वाढत असून, रुग्ण संख्या ८० हजारांच्या उंबरठ्यावर आहे. शनिवारी दिवसभरात ५९८ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७९,९३६ झाली. दिवसभरात ८१६ जण कोरोनामुक्त झाले. तर ३,७३९ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. तसेच दिवसभरात २,९२८ जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले.
शहरात शनिवारी दिवसभरात २२ रुग्ण दगावले असून, त्यात महापालिका हद्दीबाहेरील ११ जणांचा समावेश आहे. महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या आतापर्यंत १३४८ तर महापालिका हद्दीबाहेरील ५११ रुग्ण शहरात उपचारादरम्यान दगावले आहेत. तसेच १७७२ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून ३९४७ जणांना घरी सोडण्यात आले. तर ३४६६ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील ५७६ रुग्ण शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. तर महापालिका हद्दीबाहेरील ५,१७४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर महापालिका हद्दीतील ६७,८०६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीतील रहिवासी असलेले कोरोना पॉझिटिव्ह ७०३ रुग्ण शहराबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहे.