Corona Virus News : इंग्लंडहून पिंपरी-चिंचवड शहरातील परतलेले दोन प्रवासी कोरोना पाॅझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 07:40 PM2020-12-29T19:40:34+5:302020-12-29T19:44:22+5:30

उद्योगनगरीत मंगळवारी कोरोनाचे नवे १२१ रुग्ण

Corona Virus News : Two passengers returning from England corona positive | Corona Virus News : इंग्लंडहून पिंपरी-चिंचवड शहरातील परतलेले दोन प्रवासी कोरोना पाॅझिटिव्ह

Corona Virus News : इंग्लंडहून पिंपरी-चिंचवड शहरातील परतलेले दोन प्रवासी कोरोना पाॅझिटिव्ह

googlenewsNext

पिंपरी : इंग्लंडहून परतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील २१५ प्रवाशांचा शोध घेण्यात आला असून, १६७ प्रवाशांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यातील ११२ जणांचा अहवाल मंगळवारी निगेटिव्ह आला असून, दोन जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. तसेच ५३ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोना विषाणूंचा संसर्ग कमी होत आहे. मंगळवारी १२१ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९६,३१६ झाली. तर दिवसभरात १५६ जण कोरोनामुक्त झाले. १७९० संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. तसेच दिवसभरात १,४०१ जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले.

शहरात मंगळवारी दिवसभरात तीन रुग्ण दगावले. यात महापालिका हद्दीतील एक रुग्ण दगावला. महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या आतापर्यंत १,७५२ तर महापालिका हद्दीबाहेरील ७२२ रुग्ण शहरात उपचारादरम्यान दगावले आहेत. मंगळवारी दिवसभरात १,११० जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून १,८२३ जणांना घरी सोडण्यात आले. तर ६४४ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील ७० रुग्ण शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. महापालिका हद्दीबाहेरील ७,३८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर महापालिका हद्दीतील ९३,१०७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीतील रहिवासी असलेले कोरोना पॉझिटिव्ह ८३ रुग्ण शहराबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

शहरात मंगळवारी मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये पिंपरी येथील ७० वर्षीय महिला, मावळ तालुक्यातील ५५ वर्षीय पुरुष तसेच खेड तालुक्यातील ७० महिलेचा समावेश आहे.

Web Title: Corona Virus News : Two passengers returning from England corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.