Corona virus : पिंपरीत कोरोना बाधितांचा आकडा २००० वर, मंगळवारी दिवसभरात १८६ नवीन रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 11:29 PM2020-06-23T23:29:55+5:302020-06-23T23:30:05+5:30

पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव..

Corona virus : The number of corona cases in Pimpri-Chinchwad has risen to 2,000, with 184 new patients on Tuesday | Corona virus : पिंपरीत कोरोना बाधितांचा आकडा २००० वर, मंगळवारी दिवसभरात १८६ नवीन रुग्ण

Corona virus : पिंपरीत कोरोना बाधितांचा आकडा २००० वर, मंगळवारी दिवसभरात १८६ नवीन रुग्ण

Next

पिंपरी : पिंपरी -चिंचवड औद्योगिकनगरीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, दिवसभरात १८६ जणांना कोरोनाची बाधा झाली असून बाधितांची संख्या २०३४ वर पोहोचली आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या १३७ जणांना डिस्चार्ज दिला. जुनी सांगवी, कोथरूड आणि चिंचवड येथील तिघांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शहरातील १७१ जणांचे आणि पुण्यातील १५ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. एकुणामध्ये ११० पुरुष आणि ७६ महिलांचा समोवश आहे. शहरातील   दापोडी, पिंपळेगुरव, इंद्रायणीनगर, चिंचवड, रहाटणी, शिंदेनगर, जुनी सांगवी, यमुनानगर, पंचतारानगर- आकुर्डी, संत तुकारामनगर-भोसरी, विठ्ठलनगर, नेहरूनगर, शास्त्रीनगर, रमाबाईनगर, वैभवनगर,  साईबाबानगर-चिंचवड, वाल्हेकरवाडी, रावेत, ताथवडे, आनंदनगर-पिंपळे गुरव, गुलाबनगर-दापोडी, कुदळवाडी, कासारवाडी, शिवशाहीनगर-दिघी,  चिंचवड,  पिंपळे सौदागर, बौध्दनगर आणि गणेश खिंड, वारजे माळवाडी, बोपोडी, टिंगरेनगर, विश्रांतवाडी, खडकी, औध, कसबापेठ पुणे,  दौंड या भागांतील नागरिकांचा समावेश आहे. या रुग्णांवर महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि भोसरीतील महापालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  दिवसभरात ४८३ जणांना रूग्णालयात दाखल केले आहे. दोन दिवसांपूर्वी एनआयव्हीकडे पाठविण्यात आलेल्या घशातील द्रवाचे नमुने पाठविले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यापैकी १८६  जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर २८०  जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर ३३१ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत २०३४  जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या ७९२   सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
पॉझिटिव्ह रुग्ण येण्याचे प्रमाण अधिक असले तरी कोरोनामुक्त होण्याचेही प्रमाण वाढू लागले आहेत. १२७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त झालेल्यामध्ये आनंदनगर चिंचवड, अजंठानगर, भारतनगर, सद्गुरू कॉलनी-वाकड, बौध्दनगर, अशोकनगर, सिद्धार्थनगर- दापोडी, पिंपळे गुरव, ,मोरवस्ती, चिखली, वैभवनगर पिंपरी, जुनी सांगवी, आनंदनगर, पिंपरीगाव, गवळीनगर-भोसरी, भाटनगर-पिंपरी, वडमुखवाडी, जळगाव, पेठ, येरवडा, हडपसर, वडगाव, कोंढवा येथील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्यांना घरी सोउले आहे. आजपर्यंत  ११९७  जण कोरोनामुक्त झाले आहे.
...............
तिघांचा मृत्यू
पवनानगर जुनी सांगवीतील ७२  वर्षांचे ज्येष्ठ, अजंठानगर चिंचवड येथील ४८ वर्षांचा तरूण, कोथरूड येथील ४७ वर्षांच्या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे शहरातील ३५ जणांचा तर शहराबाहेरील महापालिका रुग्णालयात उपचार घेणाºया २५ अशा ६०जणांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Corona virus : The number of corona cases in Pimpri-Chinchwad has risen to 2,000, with 184 new patients on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.