Corona Virus In Pimpri : पिंपरी चिंचवडमध्ये दाट लोकवस्तीत कोरोनाचा विळखा होतोय घट्ट; शनिवारी २ हजार ८३२ नवे पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 09:05 PM2021-04-03T21:05:29+5:302021-04-03T21:05:47+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोना रुग्णांत वाढ
पिंपरी : महापालिका परिसरातील दाट लोकवस्तीत कोरोनाचा विळखा वाढत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांनी आज उच्चांक गाठला आहे. दिवसभरात २ हजार ८३२ रुग्ण सापडले असून १ हजार ८५४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर पंधरा जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर ५ हजार ०१ जणांना डिस्चार्ज दिला आहे. चिंचवड, सांगवी, भोसरी, सांगवी या भागातील दाट लोकवस्तीत कोरोना वाढला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोना रुग्णांत वाढ होत आहे. काल २४०० आलेली रुग्णसंख्या चारशेंनी वाढली आहे. महापालिका क्षेत्रातील विविध रुग्णालयात ५ हजार ९८१ जणांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशातील द्रवाच्या नमुण्यांपैकी २ हजार ४०२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर २ हजार २९३ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे दाखल रुग्णांची संख्या ३ हजार ३९३ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात आज पाच हजार एक जणांना डिस्चार्ज दिला आहे.
............................
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनामुक्त रुग्णांची संख्याही वाढत आहे. कालच्या तलनेत पाचशेंनी अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १ लाख २४ हजार ८४४ वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ४७ हजार ५४६ वर गेली आहे.
..................................
पंधरा जणांचा बळी
कोरोनामुळे मृत होणाऱ्यांची संख्या आज वाढली आहे. शहरातील १५ आणि शहराबाहेरील २ अशा एकूण १७ जणांचा बळी घेतला आहे. त्यात शहरातील ११ पुरूष आणि ४ महिलांचा समावेश आहे. त्यात तरुण आणि ज्येष्ठांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मृतांची संख्या २ हजार ०४९ वर पोहोचली आहे.
......................
१४ हजार जणांना लसीकरण
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढला आहे. शहरातील महापालिकेच्या ५० आणि खासगी २९ अशा एकूण ७९ केंद्रावर लसीकरण सुरू आहे. महापालिका रुग्णालयात ११ हजार २५९ जणांना लसीकरण करण्यात आहे. तर खासगी रुग्णालयांसह ४ हजार ६७० जणांना लस देण्यात आली. वयवर्षे ४५ पेक्षा अधिक असणाºया १२ हजार ६१५ जणांना लस देण्यात आली. त्यामुळे एकूण लसीकरण झालेल्यांची संख्या १ लाख ७४ हजार ७४६ वर पोहोचली आहे.