Corona virus : पिंपरी-चिंचवडमध्ये १ हजार २३६ जण कोरोनामुक्त, ६३३ पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2020 12:33 AM2020-10-02T00:33:28+5:302020-10-02T00:34:19+5:30

पिंपरी चिंचवड शहर परिसरामध्ये गेल्या आठवडाभरापासून कोरोनाचा आलेख कमी होत असल्याचे दिसून येत आहे.

Corona virus : Pimpri-Chinchwad 633 new positive ; 1 thousand 236 corona free | Corona virus : पिंपरी-चिंचवडमध्ये १ हजार २३६ जण कोरोनामुक्त, ६३३ पॉझिटिव्ह

Corona virus : पिंपरी-चिंचवडमध्ये १ हजार २३६ जण कोरोनामुक्त, ६३३ पॉझिटिव्ह

googlenewsNext
ठळक मुद्दे५ हजार २११ जणांचे अहवाल निगेटिव्ह

पिंपरी : पॉझिटिव्ह रुग्णाच्या तुलनेत पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढली आहे. आज दिवसभरामध्ये ६३३ पॉझिटिव्ह आढळले असून १ हजार २३६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर शहर परिसरातील पाच जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे.

 पिंपरी चिंचवड शहर परिसरामध्ये गेल्या आठवडाभरापासून कोरोनाचा आलेख कमी होत असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या आणि खासगी रुग्णालयांमध्ये आज ४ हजार ७७ जणांना दाखल करण्यात आले असून पुण्यातील एन आय व्हीकडे पाठवलेल्या रुग्णांच्या घशातील द्रव्यांच्या नमुन्यांपैकी ५ हजार २११ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १ हजार २२१ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
............
दिवसभरामध्ये ४५०२ लोकांना डिस्चार्ज 
शहर परिसरात दिवसभरामध्ये ४ हजार ५०२ लोकांना डिस्चार्ज  दिला असून रुग्णालयांमध्ये ४ हजार १३९ दाखल आहेत.  कोरोनाचा वेग कमी होत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात परिसरामध्ये कोरोनामुक्त नागरिकांचा आलेख वाढत असून दिवसभरामध्ये १ हजार २३६ जाणार कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ७१ हजार १३४ झाली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७८ हजार ०१४ वर पोहोचली आहे.
........
पाच जणांचा मृत्यू
पिंपरी चिंचवड परिसरातील ५ आणि  पिंपरी  शहराबाहेरील ४ अशा एकूण नऊ जणांचा बळी घेतला असून बळीमध्ये ज्येष्ठांची संख्या अधिक आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या १ हजार ३२२ झाली आहे.

Web Title: Corona virus : Pimpri-Chinchwad 633 new positive ; 1 thousand 236 corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.