Corona virus : पिंपरी महापालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांना कोरोनाचा संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 12:37 PM2020-07-07T12:37:25+5:302020-07-07T12:45:43+5:30

कोरोनामुळे विरोधीपक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचे शनिवारी निधन झाले आहे.

Corona virus : Pimpri Municipal Corporation Shiv Sena group leader Rahul Kalate was corona infected | Corona virus : पिंपरी महापालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांना कोरोनाचा संसर्ग

Corona virus : पिंपरी महापालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांना कोरोनाचा संसर्ग

Next
ठळक मुद्देकोरोनाने लोकप्रतिनिधी, महापालिका कर्मचाऱ्यांनाही विळखा सहाय्यक आयुक्तालाही कोरोनाची बाधा

पिंपरी : महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांचे सोमवारी  रात्री रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.  आजपर्यंत पाच नगरसेवकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर, महापालिकेच्या एका सहाय्यक आयुक्तालाही  कोरोनाची बाधा झाली आहे.  

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहेत. कोरोनाने लोकप्रतिनिधी, महापालिका कर्मचाऱ्यांनाही विळखा घातला आहे. शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना मदत केली होती. जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले. तसेच महापालिकेतील विविध बैठकांना देखील ते हजर राहत असत. त्यामुळे त्यांचा अनेकांशी संपर्क आला होता.
त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने रविवारी सायंकाळी तपासणीसाठी पाठविले होते. त्याचे रिपोर्ट आता आले आहेत. त्यामध्ये पॉझिटीव्ह आहेत. त्यामुळे त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, महापालिकेच्या एका सहाय्यक आयुक्तालाही कोरोनाची बाधा झाली आहे.
यापूर्वी भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे, नगरसेवक उत्तम केंदळे, शैलेश मोरे,  चिंचवड विधानसभा मतदार संघातील सत्ताधारी भाजपच्या नगरसेविकेचे पती शेखर चिंचवडे, माजी नगरसेवक असलेल्या त्यांच्या पतीसह कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच दापोडीतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या कुटुंबातील सहा सदस्यांना आणि च-होलीतील राष्ट्रवादीच्या कुटुंबातील सदस्यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. 
कोरोनामुळे विरोधीपक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचे शनिवारी निधन झाले आहे.

Web Title: Corona virus : Pimpri Municipal Corporation Shiv Sena group leader Rahul Kalate was corona infected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.