Corona Virus Pimpri News : पिंपरीत १५१ जण कोरोना पॉझिटिव्ह तर १०५ रुग्ण झाले बरे होऊन परतले घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 22:41 IST2021-01-06T22:39:14+5:302021-01-06T22:41:24+5:30
दोन दिवस कमी असणारा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आलेख वाढला आहे.

Corona Virus Pimpri News : पिंपरीत १५१ जण कोरोना पॉझिटिव्ह तर १०५ रुग्ण झाले बरे होऊन परतले घरी
पिंपरी : दोन दिवस कमी असणारा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आलेख वाढला आहे. दिवसभरात १५१ जण पॉझिटिव्ह आढळले असून १०५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात कोरोनाने दोन जणांचा बळी घेतला आहे. ३ हजार ५१८ जणांना डिस्चार्ज दिला आहे.
गेल्या तीन चार दिवसांत वाढलेली कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सोमवारी कमी झाली होती. ती आता वाढली आहे. शहरातील विविध रुग्णालयात ३ हजार ५६४ जणांना दाखल केले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशांतील द्रवाच्या नमुण्यांपैकी ३ हजार ३३९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर २ हजार ४०१ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. तर दाखल रुग्णांची संख्या ६८६ वर पोहोचली आहे.
..............................
कोरोनामुक्त झाले कमी
कोरोनामुक्तांचा आलेख कमी झाला आहे. एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९३ हजार ८४३ वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९७ हजार ३२६ वर पोहोचली आहे.
..........
दोघांचा बळी
कोरोनाचा विळखा सैल होत असून पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत मृत्यूदरही कमी झाला आहे. शहरातील दोन जणांचा बळी घेतला आाहे. त्यात एक पुरूष आणि एक महिलेचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत होणाऱ्यांची संख्या १ हजार ७६६ वर पोहोचली आहे.