Corona virus Pimpri : पिंपरीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी, कोरोनामुक्तही घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 06:41 PM2021-07-31T18:41:08+5:302021-07-31T18:42:43+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात मागील आठवड्यात कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाला आहे.
पिंपरी: कोरोनाचा प्रादूर्भाव पुन्हा कमी झाला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांबरोबरच कोरोनामुक्तांची संख्या कमी झाली आहे. दिवसभरात एक जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे. दाखल रुग्णांची संख्याही सातशेंवर आली आहे. दिवसभरात १६ हजार नागरिकांना लस दिली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात मागील आठवड्यात कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाला आहे. तसेच लसीकरणाचा वेग कमी-अधिक होत आहे. एकूण लसीकरण पावणे अकरा लाखांवर पोहोचले आहे. शहर परिसरातील खासगी आणि शासकीय अशा विविध रुग्णालयांमध्ये ५ हजार ४३४ जणांना दाखल केले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशातील द्रवाच्या नमुन्यांपैकी १७५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर उर्वरित अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे दाखल रुग्णांची संख्या ७२९ वर पोहोचली आहे.
...................
कोरोनामुक्तांचे प्रमाण कमी
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांचे प्रमाण कमी झाले आहे. १७५ जण कोरोनामुक्त झाले असून आजपर्यंत एकूण कोरोनामुक्तांची संख्या २ लाख ५९ हजार २६५ वर पोहोचली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २ लाख ६४ हजार ५३६ वर पोहोचली आहे.
......................
एक जणांचा मृत्यू
मृतांचा आलेख वाढला आहे. आज शहरातील १ आणि शहराबाहेरील १ अशा एकूण २ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर कोरोनाने मृत होणाºयांची संख्या ४ हजार ३४४ वर पोहोचली आहे. मृतांमध्ये ज्येष्ठ नागरिक, तरूणांचा समावेश अधिक आहे.
...........................
लसीकरणाचा वेग वाढला
शहरात आज २०२ केंद्र सुरू आहे. मात्र, लसीकरण मागील आठवड्यात थंडावलेले लसीकरण वाढले आहे. आज १६ हजार ४४८ जणांना लस देण्यात आली आहे. एकूण लसीकरण १० लाख ९५ हजार ५४० वर पोहोचले आहे.