Corona virus : पिंपरी शहरातील १७७ नागरिकांवर पोलिसांकडून खटले दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 07:18 PM2020-08-12T19:18:24+5:302020-08-12T19:19:43+5:30
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने पिंपरी-चिंचवड शहराचा रेडझोनमध्ये समावेश
पिंपरी : लॉकडाऊन शिथील झाले असले तरी जमावबंदीसह काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून काही नागरिक विनाकारण बाहेर फिरत आहेत, तर काही जण नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशा नागरिकांवर भारतीय दंड विधान कलम १८८ अन्वये पोलीस खटले दाखल करीत आहेत. मंगळवारी (दि. ११) १७७ नागरिकांवर ही कारवाई करण्यात आली.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने पिंपरी-चिंचवड शहराचा रेडझोनमध्ये समावेश आहे. त्यामुळे पोलिसांकडून काही निर्बंध लागू केले आहेत. जमावबंदी व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, मास्क तसेच सॅनिटायझर आदी सुरक्षा साधनांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. मात्र त्याकडे काही नागरिक दुर्लक्ष करीत आहेत. अशा नागरिकांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मंगळवारी भादंवी कलम १८८ अन्वये मंगळवारी एमआयडीसी भोसरी (३७), भोसरी (१६), पिंपरी (११), चिंचवड (७), निगडी (१३), आळंदी (४), चाकण (६), दिघी (९), म्हाळुंगे चौकी (९), सांगवी (२), वाकड (३), हिंजवडी (५), देहूरोड (८), तळेगाव दाभाडे (९), तळेगाव एमआयडीसी (१), चिखली (२६), रावेत चौकी (२), शिरगाव चौकी (१०) या पोलीस ठाण्यांकडून १७७ नागरिकांवर खटले दाखल झाले.