Corona virus : पिंपरीत शहरात आतापर्यंत ५४ हजार २३२ जण कोरोनामुक्त; शुक्रवारी ८६२ जण परतले घरी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 12:33 PM2020-09-19T12:33:54+5:302020-09-19T12:34:32+5:30
शुक्रवारी दिवसभरात ८४३ कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले.
पिंपरी : औद्योगिक नगरीत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. तसेच पॉझिटिव्ह रूग्णांचीही संख्या कमी होऊ लागली आहे. शुक्रवारी दिवसभरात ८४३ कोरोनाचे रुग्ण आढळले असून, ८६२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील १४ आणि पुण्यातील ७ अशा एकूण २१ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. ४ हजार ०३६ जणांना डिस्चार्ज दिला आहे. २ हजार ९२७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात सामाजिक संसर्गास सुरुवात झाली आहे. त्यामुळे वैद्यकीय विभागाच्या वतीने संशयित रुग्णांच्या तपासण्या वाढविल्या आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता कमी होऊ लागली आहे. डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. तसेच कोरोनामुक्त होणाऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे. आज ४ हजार ०१७ जणांना महापालिकेच्या रुग्णालयांत दाखल केले आहे. पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या नमुन्यांपैकी २ हजार ९२७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर शहरातील बाधितांची संख्या ६८ हजार ४३९ वर पोहचली आहे. तर २ हजार ०६२ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. ४ हजार ०३६ जणांना डिस्चार्ज दिला आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या ५ हजार ५५२ झाली आहे.
...........................
२०६२ जणांचे अहवाल प्रतीक्षेत
महापालिकेतील दाखल रुग्णांपैकी चाचणी प्रतीक्षेतील अहवालांची संख्या अधिक आहे. तर डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. २०६२ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. दिवसभरात ८६२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत शहरातील एकूण ५४ हजार २३२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
.....................
मृतांमध्ये वृद्धांची संख्या अधिक
शहरातील १४ आणि पुण्यातील ७ अशा एकूण २१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजपर्यंत ११०९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महिला-पुरुष आणि वृद्धांची संख्या अधिक आहे.