Corona virus : पिंपरीमध्ये एका दिवसात आढळले तेरा रूग्ण; कोरोनाचा सातवा बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 01:44 PM2020-05-07T13:44:23+5:302020-05-07T13:44:39+5:30
पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ७९ असून, त्यातील १० रूग्ण पुण्याबाहेरील आहेत.
पिंपरी : औद्योगिकनगरीत कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असून, दिवसभरात १३ नवीन रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. शहरात उपचार घेत असलेली पुण्यातील शिवाजीनगरच्या महिलेचा कोरोनाने सातवा बळी घेतला आहे. नवीन रूग्णांमध्ये तरूणांची संख्या अधिक आहे. शहरात पॉझिटिव्ह सक्रिय रूग्णांची संख्या ७९ गेली आहे. आजपर्यंत १४५ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
पिंंपरी-चिंंचवड औद्योगिकनगरीत कोरोनाचा विळखा घट्ट होऊ लागला आहे. पिंपरीतील वायसीएम आणि भोसरीतील महापालिकेच्या रूग्णालयात कोरोनाचे रूग्ण उपचार घेत आहेत. संशयित रूग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. पुण्यापेक्षा पिंपरीत कोरोनाचा वेग काहीसा कमी आहे. शहरातील २१ ठिकाणी कंटेन्मेंट झोन असून शहराचा नव्वद टक्के भाग मुक्त झाला आहे. केवळ दहा टक्के क्षेत्रात कंटन्मेंट झोन आहे.
शहरातील २०५ रूग्णांना रूग्णालयात मंगळवारी दाखल केले होते. त्यांच्या घश्यातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील एनआयव्हीमध्ये पाठविण्यात आले आहेत. त्याचे अहवाल बुधवारी सकाळी आले असून, त्यात दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात दहा पुरूष आणि तीन महिलांचा समावेश आहे.
शहरातील ६० रुग्ण कोरोनामुक्त...
पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ७९ असून, त्यातील १० रूग्ण पुण्याबाहेरील आहेत. महापालिकेच्या रूग्णालयात उपचार घेत आहेत. तसेच पिंपरी-चिंचवडमधील परंतु, शहराबाहेरील रूग्णालयात आठजण उपचार घेत आहे. महापालिका परिसरातील रूग्ण पिंपरीतील वायसीएम रूग्णालय आणि भोसरीतील महापालिका रूग्णालयात उपचार घेत आहे. तसेच शहरातील ६० आणि पुण्यातील दोन असे एकुण ६२ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोना बळीमध्ये पुण्याचे चार
बुधवारी पॉझिटिव्ह आलेले अकरा रूग्ण शहरातील असून, मोशी, पिंपळेगुरव, चिंचवड येथील रहिवाशी आहेत. तर दोन रूग्ण पुण्यातील आहेत. पुरूषांमध्ये एकाचे वय ६ वर्षे दुसºयाचे वय २१, तिसºयाचे वय २२, चौथ्याचे वय २४, पाचव्याचे वय २८ वर्ष, सहाव्याचे ३०, सातव्याचे ५० वर्ष, आठव्याचे वय ३३, नवव्याचे वय ३३, दहाव्या व्यक्तीचे वय ५२ वर्ष आहे. तर महिलांमध्ये एकीचे वय २५, दुसरीचे वय २८ वर्षे आहे. शिवाजीनगर येथील एक महिला पिंपरी-चिंचवडमध्ये उपचार घेत होती. तिचा मृत्यू बुधवारी झाला आहे.
तसेच येरवडा येथील आणि पिंपरीत उपचार घेणा?्या पुरुषाचा बुधवारी सायंकाळी मृत्यू झाला. कोरोनामुळे शहरातील तीन आणि शहराबाहेरील चार अशा सहा जणांचा मृत्यू झाला आहे.