Corona virus : पिंपरीत कोरोना तपासणी अहवालासाठी लागतोय वेळ; रूग्णांच्या उपचारासाठी विलंब
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 07:08 PM2020-05-11T19:08:09+5:302020-05-11T19:09:38+5:30
पुण्यातील प्रयोगशाळेत कोरोना संशयित रुग्णांचे घेतलेले घशातील द्रावाचे नमुने पाठविले असता दोन-दोन दिवस त्याचा अहवाल मिळत नाही.
पिंपरी : कोरोना संशयित रुग्णांचे घेतलेले घशातील द्रावाचे नमुने पुणे शहरातील प्रयोगशाळेत पाठविले असता दोन-दोन दिवस त्याचा अहवाल मिळत नाही. पुण्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्यास सध्याच्या प्रयोगशाळेची क्षमता कमी पडणार आहे. त्यामुळे शहरात स्वतंत्र लॅब असावी, अशी मागणी होत आहे. त्यामुळे रूग्णांच्या उपचारासाठी वेळ होत आहे.
पिंपरी चिंचवड शहरातून रोज किमान शंभर संशयितांचे नमुने पुणे येथील नॅशनलय व्हायरॅलॅजी (एनईआयव्ही) मध्ये तपासणीसाठी पाठविले जातात. त्यांचा रिपोर्ट १२ तासात मिळणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात ४ तास नव्हे तर ४८ तासात सुध्दा अहवाल मिळत नाही. परिणामी पुढील उपचार अशक्य असतात. रुग्ण आणि डॅक्टरसुध्दा त्रस्त आहे. पिंपरी चिंचवड शहर २७ लाख लोकसंख्येचे आहे. या शहरासाठी एनआयव्हीच्या प्रमाणे स्वतंत्र लॅब तत्काळ सुरु करण्याची गरज आहे.
पुणे शहरातील रुग्णांची संख्या रोज १५० ने वाढतेच आहे. तिकडे रोज संशयीतांची यादी मोठी आहे. परिणामी त्यांचे नमुने प्रथम घेतले जातात. आता पुणे शहरातील रुग्णांची संख्या ३१ मे दुपटीने वाढण्याचा अंदाज आहे. पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी शहरातील कोरोना रुग्ण ३१ मे पर्यंत ९,६०० होतील असे एका मुलाखतीत सांगितले आहे. त्यामुळे पुणे शहरातील रग्णांचे अहवाल अधिक आहेत, त्यामुळे असताना पिंपरी चिंचवडचे नमुने तपासणीसाठी वेळ लागत आहे. या दिरंगाईमुळे पिंपरी चिंचवड शहरातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची कुचंबना होणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात स्वतंत्र प्रयोगशाळा तयार करण्याची गरज आहे. भोसरी येथील नारी (नॅशनल एड्स संशोधन केंद्र) संस्थेमध्ये काही नमुने तपासणीसाठी पाठवतात, पण त्यांच्याही मयार्दा आहेत. अशा परिस्थितीत तत्काळ स्वत:ची प्रयोगशाळा सुरू करण्याची गरज आहे.
पिंपरी चिंचवड शहरासाठी महापालिकेने स्वतंत्र लॅब तत्काळ सुरू करावी, अशी मागणी भाजपाच्या जेष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांनी आज महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली.