Corona Virus : चिंताजनक! पिंपरीत बुधवारी १ हजार २४८ जण कोरोना पॉझिटिव्ह; ६१५ जण कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 09:31 PM2021-03-17T21:31:46+5:302021-03-17T21:33:19+5:30
पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीतील कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे.
पिंपरी : संशयित रुग्णांच्या तपासण्याची संख्या वाढल्याने पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. दिवसभरात १ हजार २४८ जण पॉझिटिव्ह आले आहेत.तर दिवसभरात ६१५ जण कोरोनामुक्त झाले आहे. तीन जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीतील कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. महापालिकेच्या विविध रुग्णालयात ६ हजार ३९० जणांना दाखल केले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशांतील द्रवाच्या नमुण्यांपैकी ५ हजार ४०७२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १ हजार ५०६ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. तर दाखल रुग्णांची संख्या १ हजार ७५९ वर पोहोचली आहे. ७ हजार ४३० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. निगडी प्राधिकरण, थेरगाव, सांगवी आणि भोसरी परिसरात धोका वाढला आहे.
........
कोरोनामुक्त घटले
गेल्या महिनाभरात सर्वाधिक कोरोनामुक्त झाले असून ६१५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत ही संख्या निम्मी आहे. त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १ लाख ७ हजार ९६ वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १ लाख १६ हजार ८९६ वर पोहोचली आहे. मृतांमध्ये पिंपरीतील ५८ वर्षीय पुरूषाचा आणि पिंपळेनिलख येथील ८० वर्षीय, फुगेवाडीतील ९४ वर्षीय महिलेचा समावेश आहे. आजपर्यंत कोरोनामुळे मृत होणाºयांची संख्या १ हजार ८८३ वर पोहोचली आहे. सर्वच प्रभागातील रुग्णसंख्या दुप्पट झाली आहे.
...............
गाव रुग्णसंख्या
अ प्रभाग १९७
ब प्रभाग १६९
क प्रभाग १६८
ड प्रभाग १९७
इ प्रभाग १४२
फ प्रभाग १२६
ग प्रभाग १४०
ह प्रभाग १०९
..............................
एकुण १२४८
...........................
लसीकरण मंदावले
मागील आठवड्यात वाढलेले लसीकरण आता मंदावले आहे. शहर परिसरातील आठ शासकीय केंद्रावर तसेच ११ खासगी रुग्णालयातही लसीकरण सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ३ हजार ९९९ जणांना लसीकरण करण्यात आले. आजपर्यंत एकूण ७६ हजार ८१३ जणांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले आहे, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली.
...........................