coronavirus: पिंपरी-चिंचवडमध्ये अहवालांची प्रतीक्षा वाढली, २११३ पॉझिटिव्ह, मृतांची संख्या लागली वाढू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 12:06 AM2021-04-02T00:06:22+5:302021-04-02T00:06:52+5:30
coronavirus Pimpri-Chinchwad : महापालिका परिसरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कालच्या तुलनेत शंभरने कमी झाली आहे. तसेच कोरोनामुक्त रुग्णांची संख्या कमी झाली आहे.
पिंपरी : महापालिका परिसरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कालच्या तुलनेत शंभरने कमी झाली आहे. तसेच कोरोनामुक्त रुग्णांची संख्या कमी झाली आहे. दिवसभरात २ हजार ११३ रुग्ण सापडले असून १ हजार १६१जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर पंधरा जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर ३ हजार ५१० जणांना डिस्चार्ज दिला आहे. अहवालांची प्रतिक्षा वाढली आहे. २ हजार ०८५ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. (Awaits reports in Pimpri-Chinchwad, 2113 positive, death toll rises)
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात गेल्या महिनाभरापासून कोरोना रुग्णांत वाढ होत आहे. काल २२०० पर्यंत वाढलेली रुग्णसंख्या शंभरने कमी झाली आहे. महापालिका क्षेत्रातील विविध रुग्णालयात ४ हजार ४६४ जणांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशातील द्रवाच्या नमुण्यांपैकी १ हजार ९९५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर २ हजार ०८५ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे दाखल रुग्णांची संख्या ३ हजार ३६० वर पोहोचली आहे. तर दिवसभरात आज ३ हजार ५१० जणांना डिस्चार्ज दिला आहे.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनामुक्त रुग्णांची संख्या कमी झाली आहे. एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १ लाख २१ हजार ४८३ वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ४२ हजार २५१ वर गेली आहे.
पंधरा जणांचा बळी
कोरोनामुळे मृत होणाºयांची संख्या आज वाढली आहे. शहरातील १५ आणि शहराबाहेरील २ अशा एकूण १७ जणांचा बळी घेतला आहे. त्यात शहरातील १० पुरूष आणि ५महिलांचा समावेश आहे. त्यात ज्येष्ठांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मृतांची संख्या २ हजार ०१८ वर पोहोचली आहे.
४२५० नागरिकांना लसीकरण
्कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग कमी अधिक होत आहे. शहरातील महापालिकेच्या ११ आणि खासगी ३९ अशा एकूण ५० केंद्रावर लसीकरण सुरू आहे. महापालिका रुग्णालयात ३ हजार ३५२ जणांना लसीकरण करण्यात आहे. तर खासगी रुग्णालयांसह ४ हजार २८५ जणांना लस देण्यात आली. त्यामुळे एकूण लसीकरण झालेल्यांची संख्या १ लाख ३५ हजार ५६१ वर पोहोचली आहे.