coronavirus : वरसोली टोलनाक्यावरील पोलीस बंदोबस्तात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 07:52 PM2020-03-29T19:52:35+5:302020-03-29T19:55:07+5:30

संचारबंदीनंतरही अनेक लाेक प्रवास करत असल्याने पाेलीस बंदाेबस्तात वाढ करण्यात आली आहे.

coronavirus : increase in police deployment on varsoli toll plaza rsg | coronavirus : वरसोली टोलनाक्यावरील पोलीस बंदोबस्तात वाढ

coronavirus : वरसोली टोलनाक्यावरील पोलीस बंदोबस्तात वाढ

googlenewsNext

लोणावळा : कोरोना संसर्ग टाळण्याकरीता जमावबंदी व संचारबंदी लागू करुन देखील नागरिक घराबाहेर पडत असल्याने या नागरीकांना आळा घालण्यासोबत टोलनाक्यावरुन अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवांची वाहतुक वगळता सर्व प्रवासी वाहतूक बंद करण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बंदोबस्तामध्ये वाढ केली आहे. आता राज्य राखीव दलाची तुकडी टोलनाक्यावर तैनात करण्यात आली आहे. तेव्हा विनाकारण फिरणार्‍यांनो सावधान असे म्हणण्याची वेळ आली आहे.

कोरोना संसर्गचा वाढता प्रसार रोखण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी देशासह राज्यात संचारबंदी केली असून १४ एप्रिल पर्यंत भारत लाॅकडाऊन असणार आहे. लाॅकडाऊन असताना देखील शहरी भागातील कामगार हे रात्रीच्यावेळी खाजगी वाहनांमधून गावाकडे जात आहेत, काही जण पायीच गावी निघाले आहेत, अनेक स्थानिक युवक विनाकारण गाड्या घेऊन फिरत कायदा मोडत आहेत, या सर्व पार्श्वभूमीवर राज्य राखीव दलाचे (सीआरपीएफ) शंभर जवान तैनात करण्यात आले असल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक संदिप घोरपडे उपनिरीक्षक निरंजन रनावरे यांनी दिली. 

लोणावळा ग्रामीण हद्दीतील वरसोली टोल नाका, कार्ला फाटा, कुसगाव, औळकाईवाडी मुख्य चौक, पवनानगर चौक, मळवली चौक तसेच विविध गावातील प्रमुख ठिकाणी कोणीही विनापरवाना प्रवास करू नये वा संचारबंदीचे उल्लंघन करू नये ह्याच अनुशंघाने लोणावळा ग्रामीण पोलीस यांच्याकडून हे नियोजन करण्यात आले आहे. जर असे कोणी कायद्याचे उल्लंघन करत असणाऱ्याना दांडूक्याचा प्रसाद देखील दिला जात आहे.

विविध ठिकाणी असणाऱ्या अत्यावश्यक सेवा, किराणा दुकाने, भाजीपाला स्टाँल वर गर्दी होणार नाही याची काळजी देखील पोलिस प्रशासनाच्या वतीने घेतली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये आणि पोलिसांना सुरक्षेविषयी कठोर पाऊल उचलण्यास भाग पाडू नये. ह्यासाठी स्थानिक नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन स्थानिक नागरिकांना लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांनी  केले आहे.

Web Title: coronavirus : increase in police deployment on varsoli toll plaza rsg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.