Coronavirus Pimpri : पिंपरी चिंचवड शहरात साडेसात हजार बेड्सची व्यवस्था, महापालिकेचा पॉझिटिव्हीटी रेट १९.२२
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 08:39 PM2021-04-15T20:39:39+5:302021-04-15T20:39:53+5:30
पिंपरीत कोरोना संसर्ग झपाट्याने वाढतोय....
पिंपरी :औदयोगिकनगरी पिंपरी चिंचवडध्ये कोरोना रुग्णाचा पॉझिटिव्हीटी दर १९.२२ तर मृत्यूदर १.५१ टक्के असून खासगी आणि शासकीय अशी ७ हजार ६१३ बेडची व्यवस्था आहे, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली. पिंपरी-चिंचवड महापालिका कोरोनाचा विळखा वाढत असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे महापालिकेचे कार्यकारी अभियंता शिरीष पोरेड्डी यांची प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे.
पोरेड्डी म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. रुग्णांच्या उपचारासाठी वैदयकीय विभाग सक्षमतेने काम करीत आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९४ टक्के, तर पॉझिटिव्हीटी दर १९.२२ टक्के दर आहे. तर मृत्यूचा दर १.५२ टक्के आहे. तसेच होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी गाईडलाईन करण्यासाठी दोन पाळयांमध्ये डॉक्टरांचे पथक काम करीत आहे. तसेच ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटरची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.’’
...............
खासगी रुग्णालयातील रूग्णांना इंजेक्शन देण्याचा विचार
महापालिका रूग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन देण्यात येत आहे. येत्या दोन दिवसात तीन हजार इंजेक्शन महापालिकेला उपलब्ध होणार आहे, त्यामुळे त्यातील काही इंजेक्शन खासगी रुग्णालयातील रूग्णांना देता येतील का? याबाबत आयुक्त राजेश पाटील विचार करीत आहेत.
...........
शहरातील स्थिती बेड क्षमता
प्रकार महापालिका खासगी रूग्णालय
१) ऑक्सिजनविरहित १६४ १५५५
२) ऑक्सिजनसहित १०२४ १५२०
३) आयसीयू विदाऊट व्हेंटि. १६९ ५२६
४) आयसीयू विथ व्हेंटी १४४ १९३
५) अॅक्टिव्ह सीसीसी २३१८ ०
..........................
३८१९ ३७९४