महापालिकेकडून दीड लाखाचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 07:11 IST2018-06-02T07:11:13+5:302018-06-02T07:11:13+5:30
प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात होत आहे.

महापालिकेकडून दीड लाखाचा दंड वसूल
पिंपरी : प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात होत आहे. नागरिकांनी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळावा, यासाठी महापालिकेतर्फे मोहीम राबविण्यात येत आहे. दोन महिन्यांत आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्यांकडून दीड लाखाचा दंड वसूल केला आहे,
त्यामध्ये सर्वाधिक ४५ हजार रुपये दंड ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयामार्फत वसूल केला आहे. मंडई, फेरीवाले, दुकानदार यांच्याकडून २१०० किलो पिशव्या जप्त केल्या आहेत. महापालिका परिसरात प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी
सुरू आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे म्हणाले, ‘‘पर्यावरणाची आणि नागरिकांच्या आरोग्याची
हानी टाळण्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशव्या, ग्लास, कप, प्लेट्स, बाटल्या इत्यादींच्या उत्पादनांवर, तसेच वापरावर बंदी आणली. आठही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्लॅस्टिक न वापरण्यासाठी जनजागृती
करण्यात आली.
अ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत दहा हजार, ब मध्ये पंधरा हजार, क मध्ये दहा हजार, ड मध्ये दहा हजार, ई मध्ये तीस हजार, फ मध्ये पंचेचाळीस हजार, ग मध्ये वीस हजार, ह मध्ये पाच असा एक लाख ४५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामध्ये सर्वाधिक ४५ हजार रुपये फ क्षेत्रीय कार्यालयामार्फत दंड वसूल करण्यात आला आहे. तर, ह कार्यालयांतर्गत सर्वाधिक कमी पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. मंडई, फेरीवाले, दुकानदारांकडून २१९० किलो प्लॅस्टिक कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या आहेत. प्लॅस्टिक वापरणाºयांकडून पाच ते पंचवीस हजार रुपयांपर्यंत दंड वसूल केला जात आहे.