पालिकेला एलबीटीतून ९० कोटींचे उत्पन्न
By Admin | Published: April 1, 2017 02:01 AM2017-04-01T02:01:31+5:302017-04-01T02:01:31+5:30
महापालिकेच्या प्रमुख उत्पन्नाचा स्रोत असणाऱ्या एलबीटी विभागाने १०१ टक्के टारगेट पूर्ण केले आहे.
पिंपरी : महापालिकेच्या प्रमुख उत्पन्नाचा स्रोत असणाऱ्या एलबीटी विभागाने १०१ टक्के टारगेट पूर्ण केले आहे. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात तब्बल ९० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आर्थिक वर्षात मार्चअखेर पालिकेला एलबीटीद्वारे १,३९५ कोटींचे उत्पन्न मिळाले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत जकात रद्द करून १ एप्रिल २०१३ पासून एलबीटीची अंमलबजावणी सुरू झाली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा एलबीटीच्या उत्पन्नात तब्बल ९० कोटींची वाढ झाली आहे. आजअखेर ४० हजार उद्योजक, व्यापारी, व्यावसायिकांनी एलबीटीसाठी नोंदणी केली आहे. औद्योगिक मंदीचे सावट, उद्योगांचे स्थलांतर सुरू असतानाच एलबीटीने १३ कोटींच्या उत्पन्नाचा टप्पा ओलांडला. जकातीचा आलेख वर्षागणिक उंचावणारा होता. एलबीटीची अंमलबजावणी झाल्यापासून पालिकेच्या इतिहासात हे सर्वोच्च उत्पन्न आहे.(प्रतिनिधी)