नगरसेवक, अधिकारी ‘संतपीठा’साठी दौऱ्यावर
By admin | Published: May 21, 2017 03:58 AM2017-05-21T03:58:25+5:302017-05-21T03:58:25+5:30
जगद्गुरू संत तुकाराममहाराज संतपीठ स्थापन करण्यात येणार आहे. संतपीठाचा अभ्यासक्रम आराखडा, स्वरूप, इमारत रचना व आध्यात्मिक शिक्षण या विषयीची माहिती
- लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : जगद्गुरू संत तुकाराममहाराज संतपीठ स्थापन करण्यात येणार आहे. संतपीठाचा अभ्यासक्रम आराखडा, स्वरूप, इमारत रचना व आध्यात्मिक शिक्षण या विषयीची माहिती जाणून घेण्यासाठी महापालिकेचे अधिकारी व नगरसेवकांनी धार्मिक स्थळांच्या भेटीचा दौरा आखला आहे. या अभ्यास दौऱ्यास येणाऱ्या खर्चास मान्यता घेण्यात आली आहे. विषयपत्रिकेवर दौऱ्यात सहभागी होणारांमध्ये अचानकपणे नव्याने काही नावे समाविष्ट करण्यात आली आहेत.
हरिद्वार येथील पतंजली संस्कृत गुरुकुलम, गुरुकुलम कांगडी, महेश योगी गुरुकुलम (नोएडा), सुदांशू गुरुकुल (नांगलोई), संवीध गुरुकुल सध्वी ऋतुंभरा वृंदावन, मायावती आग्रारोड, श्री श्री युनिव्हर्सिटी (ओडीसा), गोदी साही (कटक) आदी ठिकाणांना दौ-यांमध्ये भेटी दिल्या जाणार आहेत.
मर्जीतील कर्मचारी?
आध्यात्मिक क्षेत्रातील काही व्यक्ती तसेच लोकप्रतिनिधी, अधिकारी यांचा दौऱ्यात सहभाग राहणार आहे. दौऱ्यात सहभागी होणाऱ्या सदस्यांची संख्या कमी अधिक होऊ शकते. असेही अभ्यास दौऱ्याच्या प्रस्तावात म्हटले आहे. त्यामुळे दौऱ्यातील सदस्यांची नावे कमी होण्यापेक्षा वाढण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे मर्जीतील काही कर्मचारी दौ-यांत सहभाग होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे दौऱ्यास येणाऱ्या
खर्चास अगोदरच मंजुरी घेण्यात आली आहे.