भ्रष्ट अधिकाऱ्यांची होणार चौकशी
By admin | Published: July 17, 2017 03:59 AM2017-07-17T03:59:59+5:302017-07-17T03:59:59+5:30
जेएनएनयूआरएमअंतर्गत महापालिकेतर्फे कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प राबविण्यात आले; मात्र या प्रकल्पांत मोठा भ्रष्टाचार आणि अनियमितता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : जेएनएनयूआरएमअंतर्गत महापालिकेतर्फे कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प राबविण्यात आले; मात्र या प्रकल्पांत मोठा भ्रष्टाचार आणि अनियमितता आहे. त्यामुळे महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून नगरविकास विभागाला याबाबत केली आहे.
भाजपाचे शहर-जिल्हा सरचिटणीस अमोल थोरात यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार याबाबतचे निर्देश दिले आहेत.
जेएनएनयूआरएमअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे प्रकल्प राबविण्यात आले. मात्र ते राबविताना अनियमितता आणि भ्रष्टाचार झाला. महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तत्कालीन काही पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून मोठा भ्रष्टाचार केला. त्यामुळे केंद्र शासन, राज्य शासन आणि महापालिकेसह शहरवासीयांची यातून आर्थिक लूट करण्यात आली.