पिंपरीत बाल गुन्हेगारीकडे वळलेल्या 80 मुलांचे समुपदेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2022 06:54 PM2022-07-18T18:54:19+5:302022-07-18T18:54:38+5:30
गुन्हेगारी मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठी, चांगले मित्र चांगले शिक्षण याची माहिती देण्यासाठी, व्यसनाधीनता टाळण्याच्या दृष्टिकोनातून या बालकांचे समुपदेशन करण्यात आले
पुणे : पिंपरी चिंचवड शहरातील बाल गुन्हेगारीकडे वळलेल्या 70 ते 80 विधी संघर्षित मुलांना ( बालगुन्हेगार) मुख्य प्रवासात आणण्यासाठी त्यांचे समुपदेशन करण्यात आले. गुन्हेगारी मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठी, चांगले मित्र चांगले शिक्षण याची माहिती देण्यासाठी, व्यसनाधीनता टाळण्याच्या दृष्टिकोनातून या मुलांचे समुपदेशन करण्यात आले. जीवन विकास फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष, समुपदेशक सुभाष औरादकर त्यांनी या विधी संघर्ष मुलांना मार्गदर्शन केले.
शहरात दरवर्षी बाल गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. अनेक कारणामुळे बालवयातच अनेक मुले गुन्हेगारीकडे वळत असल्याचे निदर्शनास आले आहे. मागील काही वर्षात हजाराहून जास्त बालगुन्हेगारांचा सहभाग वेगवेगळ्या गुन्ह्यात आढळला आहे. या बालगुन्हेगारांना वेळीच मार्गदर्शन न केल्यास पुढे जाऊन ते अट्टल गुन्हेगार बनतात. त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने या बाल गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांचे समुपदेशन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी समुदेशक सुभाष औरादकर म्हणाले, मुलांनी शालेय शिक्षणाकडे जास्तीत जास्त लक्ष दिले पाहिजे. घरातील वातावरण हे मुलांसाठी पोषक राहील असेच असावे. योग्य मित्र आणि चांगले विचार तसेच संस्कार ही महत्वाचे असतात. हेच विचार मुलांना गुन्हेगारीपासून प्रवृत करत असतात.