भोसरीत मारहाणप्रकरणी परस्परविरोधी गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 02:48 PM2019-08-25T14:48:11+5:302019-08-25T14:49:06+5:30

किरकोळ कारणावरून मारहाण केली. भोसरीतील धावडेवस्ती येथे शुक्रवारी (दि. २३) हा प्रकार घडला.

counter complaint file in bhosari for beating | भोसरीत मारहाणप्रकरणी परस्परविरोधी गुन्हा

भोसरीत मारहाणप्रकरणी परस्परविरोधी गुन्हा

googlenewsNext

पिंपरी : किरकोळ कारणावरून मारहाण केली. भोसरीतील धावडेवस्ती येथे शुक्रवारी (दि. २३) हा प्रकार घडला. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्याद देण्यात आली असून, भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या प्रकरणात प्रीती रवी सिंग (वय ३१, रा. धावडेवस्ती, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सरीता सिंग, सीमा सिंग, सुनीता सिंग, किरण सिंग, (सर्व रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी प्रीती सिंग शुक्रवारी (दि. २३) त्यांच्या घरात असताना आरोपींनी त्यांना हाताने मारहाण केली. तसेच दमदाटी करून फिर्यादी प्रीती सिंग यांचा मोबाईल फोडून नुकसान केले. तसेच त्यांच्या घरातील बॅगेत असलेले अडीच लाख रुपये व साडेचार तोळ्याची सोनसाखळी घरात ठेवलेली असताना मिळून आली नाही.

दुसऱ्या प्रकरणात सरीता राजेश सिंग (वय ४०, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रवी सिंग, प्रीती सिंग (दोघेही रा. धावडेवस्ती, भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी सिंग यांच्याकडे आरोपी रवी सिंग नोकरीस होता. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांच्या मालकीची दुचाकी आरोपी रवी सिंग याला वापरण्यास दिली होती. तसेच फिर्यादीकडून काम सोडल्यानंतर आरोपीकडे साडेचार लाख रुपये राहिले होते. तसेच फिर्यादी यांची दुचाकी परत न करता स्वत:च्या फायद्या करता वापरून त्याचा  अपहार केला. सदर दुचाकीची चावी मागण्यासाठी फिर्यादी सरीता सिंग आरोपींच्या घरी गेल्या. त्यावेळी आरोपी प्रीती सिंग हिने दुचाकीची चावी न देता फिर्यादी यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: counter complaint file in bhosari for beating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.