फिर्यादीला नुकसानभरपाई परत देण्याचे न्यायालयाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 06:41 AM2017-10-04T06:41:29+5:302017-10-04T06:41:38+5:30
पतीनेच स्वत:च्या आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची तक्रार करून नंतर साक्ष फिरविलेल्या तक्रारदार पत्नीला न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. बलात्कारीत व्यक्तीला नुकसानभरपाई म्हणून मिळालेली पावणेतीन
पिंपरी : पतीनेच स्वत:च्या आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची तक्रार करून नंतर साक्ष फिरविलेल्या तक्रारदार पत्नीला न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. बलात्कारीत व्यक्तीला नुकसानभरपाई म्हणून मिळालेली पावणेतीन लाख रुपयांची रक्कम संबंधित फिर्यादीने सरकारला परत देण्याचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. के. कदम यांनी दिले आहेत.
याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात १ एप्रिल २०१६ रोजी गुन्हा दाखल झाला होता. पीडित मुलीच्या आईने पतीविरोधात तक्रार दिली होती. संबंधित महिलेचा पती हा एका सलूनमध्ये कामाला आहे. रात्री जेवण झाल्यानंतर आम्ही झोपी गेलो. माझी लहान मुलगी सहा महिन्यांची आहे. माझे सिझेरियन झाले आहे. त्यामुळे त्या वेळी माझे पतीसोबत संबंध आले नव्हते.
मात्र, घटनेच्या दिवशी पतीने माझ्याकडे शरीरसंबंधाची मागणी केली होती. मात्र, ती मी अमान्य केली. त्यानंतर पती माझ्या मोठ्या मुलीला घेऊन झोपला होता.
मुलीवर अतिप्रसंगाची घटना घडली, तेव्हा पतीने अंगावर घेतलेली चादर मुलीकडे होती. मी मुलीला विचारले असता तिने पप्पांनीच हा प्रकार केल्याचे सांगितले. पती कामावरुन आल्यावर मी त्याला जाब विचारला असता त्याने इच्छा अनावर झाल्याने मुलीस बाहेर नेऊन अतिप्रसंग केल्याचे सांगितले. पतीविरुद्ध घृणा वाटू लागल्याने तक्रार देत असल्याचा जबाब फिर्यादीने दिला होता.