मावळात ७३ गावांत अंत्यसंस्कार उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 02:39 AM2018-06-13T02:39:01+5:302018-06-13T02:39:01+5:30
मावळ तालुक्यातील ७३ गावांत अद्याप स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांना उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे.
वडगाव मावळ - मावळ तालुक्यातील ७३ गावांत अद्याप स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांना उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे.
तालुक्यात १०४ ग्रामपंचायती असून, १८४ महसूल गावे आहेत. या पैकी ७३ गावांत आजही स्मशानभूमी नसल्याने मृतदेहावर अंत्यसंस्कार भरपावसात, उन्हात करण्याची वेळ गावोगावच्या नागरिकांवर आली आहे. तर काही ठिकाणी स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. ग्रामीण भागात आजही ७३ गावांत स्मशानभूमी नाही. तालुक्यात मौरमार वाडी, पालेनामा, बेडसे, कुसवली, केवरे, चावसर, कुसूर, कोंडीवडे, कुसगाव, कुणा नामा, घेरेवाडी, धालेवाडी, पानोली, सावळा, कळकराई, आढाववाडी, मेडलवाडी, डोंगेवाडी, गोंटेवाडी, वाघेश्वर, कचरेवाडी, भाजगाव व अन्य अशा ७३ गावांत स्मशानभूमी नाही.
प्रत्येक गावात स्मशानभूमी असणे आवश्यक असताना तब्बल ७३ गावांमध्ये अद्यापही स्मशानभूमी नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. स्मशानभूमी कधी उपलब्ध होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
याबाबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नीलेश काळे म्हणाले, ‘‘२०१४-१५ मध्ये नऊ गावांत स्मशानभूमीच्या बांधकामासाठी निधी मंजूर झाला होता. परंतु जागा उपलब्ध नसल्याने खर्च करता आला नाही. जमिनीचे भाव वाढल्याने ग्रामस्थ जमीन देण्यास टाळाटाळ करतात. काही गावांचे प्रस्ताव पाठवले असून, काही गावांची मंजुरी आली आहे.