पिंपळे सौदागर येथे बिल्डर वाधवानीविरूद्ध सात कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 03:07 PM2018-02-13T15:07:14+5:302018-02-13T15:08:55+5:30

फिर्यादी खेमचंद भोजवानी व त्यांच्या भागीदाराची ६ कोटी ९२ लाख रूपयाची आर्थिक फसवणूक केली. या आरोपाची फिर्याद भोजवानी यांनी सांगवी पोलिसांकडे केली आहे.

Crime against builder Wadhwani in Pimpale Saudagar | पिंपळे सौदागर येथे बिल्डर वाधवानीविरूद्ध सात कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा

पिंपळे सौदागर येथे बिल्डर वाधवानीविरूद्ध सात कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा

Next
ठळक मुद्देनरेश वाधवानी, जनाबाई काटे, सुरेश काटे, राजू काटे, संतोष काटे, वैशाली काटे अशी आरोपींची नावे६ कोटी ९२ लाखांची आर्थिक फसवणूक झाल्याची फिर्याद दाखल

पिंपरी : पिंपळे सौदागर येथील जमिनीची खरेदी व विकसन हक्क करार फिर्यादी व त्यांच्या भागीदार कन्हैयालाल होतचंद मतानी यांना प्राप्त झाला होता. अशा परिस्थितीत, कायदेशीर बाबींची पूर्तता न करता प्रमुख आरोपी बांधकाम व्यवसायिक नरेश वाधवानी यांनी या जमिनीचे खरेदी व विकसनाचे हक्क स्वत: कडे घेतले. फिर्यादी खेमचंद भोजवानी व त्यांच्या भागीदाराची ६ कोटी ९२ लाख रूपयाची आर्थिक फसवणूक केली. या आरोपाची फिर्याद भोजवानी यांनी सांगवी पोलिसांकडे केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश ठाकुरदास वाधवानी यांच्यासह जनाबाई जयंवत काटे, सुरेश जयवंत काटे, राजू जयवंत काटे, संतोष जयवंत काटे, वैशाली चंद्रकांत काटे अशी आरोपींची नावे आहेत. संबंधित जमिनीचे विकसनाचे हक्क एम बी डेव्हलपर्सतर्फे फिर्यादी तसेच त्यांचे भागीदार कन्हैयालाल मतानी यांना आॅक्टोबर २०१० मध्ये मिळाले आहेत. सर्व्हे क्रमांक ४० मधील ३६.३८८० गुंठे जमिनीचे ओम डेव्हलपर्स यांच्याकडून विकसन आणि खरेदीचे हक्क त्यांनी प्राप्त केले. मात्र मंगलमूर्ती डेव्हलपर्सतर्फे बिल्डर नरेश वाधवानी यांनी जमिनीचे मूळ मालक काटे व त्यांच्या वारसांबरोबर संगनमत करून हवेली दुय्यम निबंधक कार्यालय येथे सर्च टायटल रिपोर्ट न घेता, स्वत: च्या नावे जमिनीची दस्तनोंदणी केली. त्यामुळे ६ कोटी ९२ लाखांची आर्थिक फसवणूक झाल्याची फिर्याद भोजवानी यांनी दिली आहे.

Web Title: Crime against builder Wadhwani in Pimpale Saudagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.