नगरसेविका आसवानी यांच्यावर गुन्हा
By admin | Published: September 12, 2015 04:09 AM2015-09-12T04:09:38+5:302015-09-12T04:09:38+5:30
भाडेकरारावर घेतलेल्या दुकानाची मुदत संपूनही ताबा सोडण्यास नकार देऊन जागामालकास जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी नगरसेविका सविता आसवानी यांच्यासह
भोसरी : भाडेकरारावर घेतलेल्या दुकानाची मुदत संपूनही ताबा सोडण्यास नकार देऊन जागामालकास जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी नगरसेविका सविता आसवानी यांच्यासह चार जणांविरुद्ध भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नथू पिराजी शिंदे (वय ५२, रा. बजरंग चौक, मारुती मंदिराशेजारी, भोसरी गावठाण) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगरसेविका सविता आसवानी (रा. पीडब्ल्यूडी वसाहत, पिंपरी) यांच्यासह पती धनराज नथुराम आसवानी, मुलगा अरविंद धनराज आसवानी, बी. एम. आहरकर व इतर अज्ञात इसमांविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी नथू शिंदे यांच्या मालकीचे भोसरी येथे दुकान आहे. हे दुकान नगरसेविका सविता आसवानी यांना पाच वर्षांच्या करारावर ३१ जुलै २०१० रोजी शिंदे यांनी भाड्याने दिले होते. ३१ जुलै २०१५ ला करार संपुष्टात आला. त्यामुळे शिंदे यांनी दुकान खाली करण्यास आसवानी यांना सांगितले. मात्र, आसवानी यांनी त्यास नकार दिला. एवढेच नव्हे, तर अपहरण करून जिवे मारण्याची धमकी शिंदे यांना दिली होती.