तळेगाव दाभाडेमध्ये विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 17:33 IST2022-05-21T16:32:42+5:302022-05-21T17:33:14+5:30
२४ डिसेंबर २०१६ पासून २० मे २०२२ या कालावधीत ही घटना घडली...

तळेगाव दाभाडेमध्ये विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा
पिंपरी : विवाहितेचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. याप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल केला. तळेगाव दाभाडे येथे २४ डिसेंबर २०१६ पासून २० मे २०२२ या कालावधीत ही घटना घडली.
शोभना सुशील देवरे (वय ३१), असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. अशोक सोनबा भालेराव (वय ६१, रा. संत तुकारामनगर, वल्लभनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. २०) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सुशील सुरेश देवरे (वय ३५, रा. दुबई), सुरेश चिंधा देवरे, कुसूमबाई सुरेश देवरे (रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची मुलगी शोभना हिचा सुशील देवरे याच्यासोबत विवाह झाल्यापासून सुशील आणि त्याच्या आईवडिलांनी फिर्यादीची मुलगी शोभना हिला वारंवार मानसिक त्रास देऊन भांडण केले. सुशील याने हाताने मारहाण केली. तू माझ्या मुलाच्या आयुष्यात साडेसाती आली आहे. तुझ्यापेक्षा चांगली मुलगी माझ्या मुलाला भेटली असती, तू मेली तरी मी माझ्या मुलाचे दुसरे लग्न करून देईल, असे सुशील याचे आईवडील म्हणून आरोपींनी फिर्यादीची मुलगी शोभना यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, असे फिर्यादीत नमूद आहे.