विनयभंगप्रकरणी निरीक्षकावर गुन्हा
By Admin | Published: June 9, 2015 05:40 AM2015-06-09T05:40:55+5:302015-06-09T05:40:55+5:30
नाकाबंदीदरम्यान महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकासह एका शिपायावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी : नाकाबंदीदरम्यान महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकासह एका शिपायावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १ जूनला पहाटे तीनच्या सुमारास बावधनमधील चांदणी चौकात घडला.
पोलीस निरीक्षक संदीपान सावंत आणि शिपाई पुंजरवाड अशी त्यांची नावे आहेत. हे दोघेही कोथरूड वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. हिंजवडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी : १ जूनला रात्री सावंत व त्यांचे सहकारी चांदणी चौकात नाकाबंदी करीत होते. दरम्यान, पीडित महिला व त्यांचे नातेवाईक मोटारीतून चौकात आले असता दरम्यान, पीडित महिला त्या ठिकाणी आली व नातेवाइकाच्या पत्नीला सोबत घेऊन जाण्याची परवानगी देण्याबाबत आणि त्यांची चूक असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची विनंती पोलिसांकडे केली. पुंजरवाड यांनी पीडित महिलेच्या नातेवाइकासोबत झटापट केली. (प्रतिनिधी)