संतोष पिंजण यांच्यावर गुन्हा
By admin | Published: April 20, 2017 07:00 AM2017-04-20T07:00:41+5:302017-04-20T07:00:41+5:30
लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या घराच्या बाहेर दरवाज्यात शनिवारी रात्री पावणेदोन वाजण्याच्या सुमारास काळ्या बाहुलीची बांधलेला तिरडी
लोणावळा : लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या घराच्या बाहेर दरवाज्यात शनिवारी रात्री पावणेदोन वाजण्याच्या सुमारास काळ्या बाहुलीची बांधलेला तिरडी उतारा व मृत्युयंत्र असलेला कागद ठेवत अंधश्रद्धा पसरविणारा भोंदूबाबा संतोष पिंजण (रा. गावडे चाळ, भांगरवाडी, लोणावळा) याला लोणावळा शहर पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. त्याच्यावर महाराष्ट्र नरबंदी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ चे कलम २ (१) ८ अन्वेय गुन्हा नोंदविण्यात आला. त्याला वडगाव न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नगराध्यक्षा जाधव या सहकारी नगरसेवकाच्या मुलीच्या लग्नासाठी केरळला गेल्या होत्या. मंगळवारी रात्री परतल्यानंतर घराबाहेरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता त्यामध्ये पिंजण हाच उतारा ठेवताना दिसून आला. पिंजण व त्यांचा मुलगा दुचाकीवरून येताना व जाताना स्पष्ट दिसत असल्याने हा उतारा पिंजण यांनेच ठेवल्याचे स्पष्ट झाले. मात्र, त्याला कोणी उतारा ठेवण्यास भाग पाडले, याचा तपास लोणावळा पोलीस करीत आहेत.(वार्ताहर)