गांजा बाळगल्या प्रकरणी महिलेवर निगडीत गुन्हा दाखल; ८३० ग्रॅम गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 20:16 IST2021-08-03T20:15:55+5:302021-08-03T20:16:40+5:30
निगडी येथे एका महिलेने गांजा बाळगला असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली.

गांजा बाळगल्या प्रकरणी महिलेवर निगडीत गुन्हा दाखल; ८३० ग्रॅम गांजा जप्त
पिंपरी : गांजा बाळगल्या प्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेकडून ८३० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. प्रिया संतोष शिंदे उर्फ प्रिया सुरेश गायकवाड (वय ३१, रा. सेक्टर नंबर २२, ओटास्कीम, सिद्धार्थनगर, निगडी) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या महिला पोलीस नाईक अनिता यादव यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडीत सिद्धार्थनगर ओटास्कीम येथे एका महिलेने गांजा बाळगला असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार सोमवारी दुपारी पावणे तीन वाजता अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली पोलिसांनी ८३० ग्रॅम वजनाचा २० हजार ७५० रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.