बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या दोघांवर गुन्हे

By admin | Published: March 16, 2016 08:36 AM2016-03-16T08:36:54+5:302016-03-16T08:36:54+5:30

दवाखाना उघडून बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या दोघांवर भोसरी पोलीस ठाण्यात

The crime of both the bogus medical practitioners | बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या दोघांवर गुन्हे

बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या दोघांवर गुन्हे

Next

भोसरी : दवाखाना उघडून बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या
दोघांवर भोसरी पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला असून, डॉ. मेमन अमिन करी व जावरमियॉ महमद मियॉ शेख (वय ३४, रा. पारशी चाळ, देहूरोड) अशी या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. मेमन व जावरमियॉ शेख हे दापोडी येथे आयुर्वेदिक दवाखाना उघडून व्यवसाय करीत होते. कुठलीही शैक्षणिक पात्रता नसताना या दोघांनी दवाखाना उघडून बोगस व्यवसाय सुरू केला होता. महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री देवीदास शेलार यांनी याबाबत तपासणी केली असता, हे दोघेही बोगस आयुर्वेदिक दवाखाना उघडून व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात दिलेल्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर संबंधित विभागाने कारवाई करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The crime of both the bogus medical practitioners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.