Video: ‘थेरगाव क्‍विन’ वर गुन्हा दाखल; मात्र तिच्या अकाउंटवरून अजूनही होतायेत पोस्ट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 02:14 PM2022-02-01T14:14:17+5:302022-02-01T14:15:50+5:30

सोशल मीडियावर अश्‍लिल भाषेचे आणि धमकी देणारे व्हिडिओ पोस्ट व्हायरल करणाऱ्या ‘थेरगाव क्‍विन’ वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Crime filed against Thergaon Queen However her account is still going viral in pimpri | Video: ‘थेरगाव क्‍विन’ वर गुन्हा दाखल; मात्र तिच्या अकाउंटवरून अजूनही होतायेत पोस्ट व्हायरल

Video: ‘थेरगाव क्‍विन’ वर गुन्हा दाखल; मात्र तिच्या अकाउंटवरून अजूनही होतायेत पोस्ट व्हायरल

googlenewsNext

पिंपरी : सोशल मीडियावर अश्‍लिल भाषेचे आणि धमकी देणारे व्हिडिओ पोस्ट व्हायरल करणाऱ्या ‘थेरगाव क्‍विन’ वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इन्स्टाग्रामवर ‘थेरगाव क्‍विन’ नावाने अकाऊंट चालविणाऱ्या या मुलीबरोबरच आणखी काही तरुण - तरुणींचा समावेश असल्याचे व्हिडिओतून समोर आले आहे. या मुलीच्या अकाऊंटवर ३२ हजारांच्या आसपास फॉलोवर्स आहेत. त्यामुळे अशा व्हिडिओमुळे इतर मुलामुलींची मानसिक स्थिती बिघडू लागली आहे. यामुळेच पोलिसांनी अखेर गुन्हा दखल करून या थेरगाव क्वीनला अटक केली आहे. मात्र कालपासून अजून दोन पोस्ट थेरगाव क्वीन या अकाउंटवरून व्हायरल झाल्या आहेत. असे लोकमतच्या पाहणीतून दिसून आले आहे. थेरगाव क्वीन पोलिसांच्या ताब्यात असतानाही या पोस्ट कुठून व्हायरल होत आहेत. हा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला आहे. 

पोलिसांनी केले होते समुपदेशन 

''थेरगाव क्वीन नावाने अकाउंट चालवणारी मुलगी खूप दिवसांपासून शिवीगाळ आणि धमकी देणारे विडिओ व्हायरल करत आहे. तिचे वय बघता आम्ही अगोदर या मुलीचे समुपदेह्सन केले होते. पण हिने व हिच्या साथीदारांनी आमच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. आणि पुन्हा पुन्हा तेच व्हिडीओ सोशल मीडियावर येऊ लागले. अखेर या मुलीने आम्हाला अटक करण्यास भाग पडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.''

मुलामुलींची नितीभ्रष्ट होण्यास व मानसिक स्थिती बिघडविण्यास आरोपी कारणीभूत

थेरगाव येथे राहणाऱ्या मुलीने मुलगी इन्टाग्रामवर ‘थेरगाव क्‍विन’ अकाउंट उघडले. आपल्या साथीदारांसोबाबत मिळून अश्‍लिल भाषा वापरून धमकीचे व्हिडिओ तयार केले. ते व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील अकाऊंटवर टाकले. तसेच ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले. सोशल मीडियावरील ही पोस्ट पाहून समाजातील मुलामुलींची नितीभ्रष्ट होण्यास व मानसिक स्थिती बिघडविण्यास आरोपी कारणीभूत ठरत असल्याचे समोर आले. 

Web Title: Crime filed against Thergaon Queen However her account is still going viral in pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.