Crime News : जाब विचारल्याने तरुणाला गाडीच्या बोनेटवरून फिरवले; आकुर्डी येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 11:33 AM2024-12-04T11:33:53+5:302024-12-04T11:36:30+5:30
याप्रकरणी निगडी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
पिंपरी : गाडीला धक्का मारल्याचा जाब विचारल्याने तिघांनी एका तरुणाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तरुणाला कारने धडक देऊन बोनेटवरून काही अंतर नेले. ही घटना रविवारी रात्री पावणेदहा वाजताच्या सुमारास आकुर्डी रेल्वे स्टेशन ते बिजलीनगर येथे घडली.
जेकेरिया जेकब मैथ्यू (२३, रा. निगडी), असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. कमलेश ऊर्फ अशोक पाटील (२३, रा. बिजलीनगर, चिंचवड), हेमंत चंद्रकांत म्हाळसकर ऊर्फ सोन्या चंद्रकांत म्हाळसकर (२६, रा. तळेगाव दाभाडे), प्रथमेश पुष्कल दराडे (२२, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
जाब विचारल्याने तरुणाला गाडीच्या बोनेटवरून फिरवले; आकुर्डी येथील घटना#pimprichonchwad#car#Police#Crimepic.twitter.com/IWGNjJ9t4v
जाब विचारल्याने तरुणाला गाडीच्या बोनेटवरून फिरवले; आकुर्डी येथील घटना#pimprichonchwad#car#Police#Crimepic.twitter.com/IWGNjJ9t4v— Lokmat (@lokmat) December 4, 2024
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जेकेरिया आणि त्यांचे मित्र (एमएच १४ एलव्ही ९४४६) या दुचाकीवरून जात होते. कमलेश याने स्कोडा (एमएच १४ एफजी ३६१५) या कारने फिर्यादी जेकेरिया यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे जेकेरिया यांनी त्याचा कमलेश याला जाब विचारला. त्या कारणावरून कमलेश आणि त्याच्या मित्रांनी जेकेरिया यांना मारहाण केली. त्यानंतर जेकेरिया यांना कारने धडक दिली. त्यात जेकेरिया हे कारच्या बोनेटवर पडले. संशयितांनी फिर्यादी यांना बोनेटवरून आकुर्डी रेल्वे स्टेशन येथून संभाजी चौक बिजलीनगरदरम्यान नेले. यामध्ये फिर्यादीच्या छातीला मार लागून जखमी झाले. त्यानंतर संशयित पळून गेले.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चा
दरम्यान, फिर्यादी जेकेरिया यांनी १०० क्रमांकावर फोन केला. त्यानंतर पोलिस घटनास्थळी आले. निगडी पोलिस ठाणे गाठले. गुन्हा दाखल करून घेत निगडी पोलिसांना संशयितांना अटक केली. तसेच व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर या घटनेची चर्चा होती. ऑडी वाहनाच्या काळ्या काचा होत्या. तसेच नंबरप्लेटही नियमानुसार नसल्याचे तपासात पुढे आले आहे. निगडी पोलिस तपास करीत आहेत.