भावाला फोन केला म्हणून पत्नीवर प्राणघातक हल्ला; मोशीमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2024 12:51 PM2024-12-06T12:51:25+5:302024-12-06T12:51:25+5:30

पतीने पत्नीवर खुनी हल्ला करत तिला गंभीर जखमी केले.

crime news Wife assaulted for calling brother; Incident in Moshi | भावाला फोन केला म्हणून पत्नीवर प्राणघातक हल्ला; मोशीमधील घटना

भावाला फोन केला म्हणून पत्नीवर प्राणघातक हल्ला; मोशीमधील घटना

पिंपरी : पतीचा पाय दुखत असल्याने उपचारासाठी गावी नेण्याबाबत पतीच्या भावाला पत्नीने फोन केला. त्या कारणावरून पतीने पत्नीवर खुनी हल्ला करत तिला गंभीर जखमी केले. पोलिसांनी पतीला अटक केली. ही घटना बुधवारी (दि. ४) सकाळी मोशी येथे घडली. जावेद मधू पठाण (४०, रा. मोशी), असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे.

याप्रकरणी जावेद याच्या पत्नीने एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावेद याचा उजवा पाय तीन दिवसांपासून दुखत आहे. पायाचे दुखणे वाढत असल्याने त्याला उपचारासाठी मूळ गावी शिंदेवाडी जुन्नर येथे घेऊन जाण्याबाबत जावेद याच्या भावाला त्याच्या पत्नीने फोन केला. या कारणावरून जावेद याने पत्नीला बॅट आणि फरशीने मारून गंभीर जखमी केले. तसेच जावेद याने भावाच्या पत्नीलादेखील बॅटने मारून जखमी केले. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: crime news Wife assaulted for calling brother; Incident in Moshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.