चिखलीतील सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 01:41 AM2018-10-23T01:41:52+5:302018-10-23T01:41:54+5:30

ज्यूस सेंटरजवळ आलेल्या महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी नितीन रोकडे या आरोपीसह साथीदारांविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात शनिवारी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime on social worker in Chikhliya | चिखलीतील सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हा

चिखलीतील सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हा

googlenewsNext

पिंपरी : ज्यूस सेंटरजवळ आलेल्या महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी नितीन रोकडे या आरोपीसह साथीदारांविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात शनिवारी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘मी नगरसेवक होणार आहे, तू माझ्याबरोबर फिरायला चल’ असे म्हणत गैरवर्तन केले. तसेच पोलिसांकडे तक्रार देऊ नये, असे धमकावल्याची फिर्याद महिलेने रोकडे यांच्यासह साथीदारांविरुद्ध दिली आहे. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून घेतला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोकडे हे मित्रांबरोबर चिखलीतील ज्यूस सेंटरवर थांबले होते. त्या वेळी तेथून जात असलेल्या महिलेजवळ जाऊन आरोपीने तिला फिरायला येण्याची आॅफर दिली. मात्र महिलेने नकार दिला. त्या वेळी आरोपीने महिलेशी असभ्य वर्तन केले. घडल्या
प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार दिल्यास तुला व तुझ्या मुलीला बघून घेतो, असे धमकावत महिलेच्या कपाळावर ग्लास मारला.
>मोशीत तिघांवर तक्रार दाखल
पिंपरी : कपड्यांना इस्त्री केल्याचे पैसे देण्याच्या बहाण्याने आलेल्या आरोपींनी मोशी, नागेश्वरनगर येथे राहणाऱ्या मुलीचा विनयभंग केला. याप्रकरणी तिघांविरुद्ध भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयवंत ज्ञानेश्वर जगदाळे (रा. नागेश्वरनगर, मोशी) या प्रमुख आरोपीसह अन्य दोन आरोपींविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. ३१ वर्षे वयाच्या महिलेने आरोपींविरोधात पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी महिलेची मुलगी एकटीच घरी असताना, आरोपी दोन साथीदारांसह तिच्या घरी गेला. घरात कोणीही नसल्याचा गैरफायदा उठवीत त्याने मुलीचा विनयभंग केला.

Web Title: Crime on social worker in Chikhliya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.