‘साईप्रसाद’च्या वीस संचालकांवर गुन्हा
By admin | Published: October 21, 2016 04:34 AM2016-10-21T04:34:50+5:302016-10-21T04:34:50+5:30
साईप्रसाद ग्रुप आॅफ कंपनीचे मुख्य संचालक बाळासाहेब भापकर यांच्यासह २० जणांविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात फ सवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पिंपरी : साईप्रसाद ग्रुप आॅफ कंपनीचे मुख्य संचालक बाळासाहेब भापकर यांच्यासह २० जणांविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात फ सवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
या प्रकरणी गुंतवणूकदार उत्तम मारुती थोरवे (वय ६१, रा़ आळंदी- मरकळ रस्ता, चऱ्होली-खुर्द) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फि र्याद दाखल केली आहे़ गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये वंदना बाळासाहेब भापकर, शेखर विजयकांत शेवाळे, विजयकांत आबासाहेब शेवाळे, संजय रॉय, प्रदीप कौल, शिशुपाल यादव, विकास सावंत, प्रदीप सावंत, ज्ञानेश्वर जाचक, निखिल गौरशेट्टीवार, भूषण आरेकर, संजय शर्मा, अमित देसाई, के़ पी़ दुबे, अनिल शिंदे, अमोल पवार, एस़ एल़ श्रीवास्तव यांच्यासह जाधव, दोशी, नेरलेकर यांचा समावेश आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड येथील साईप्रसाद ग्रुप आॅफ कंपनीच्या संचालक मंडळाने गुंतवणूकदारांना जादा परतावा देण्याचे आमिषाने मोठी गुंतवणूक करून घेतली़ त्यांनी गुंतवणूकदारांचा विश्वास संपादित करून आपापसांत कट रचला़ त्यानुसार गुंतवणूकदारांची एकत्रित झालेल्या रकमेवर परतावा न
देता फसवणूक केली़ त्यात गुंतवणूकदार थोरवे यांचे सुमारे ५० लाख आणि इतर गुंतवणूकदारांचे २ कोटी ९१ लाख अशी मिळून ३ कोटी ४१ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघकीस आला़ (प्रतिनिधी)