पिंपरीतील ओमिशा चिट फंड कंपनीविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 06:34 PM2018-08-30T18:34:52+5:302018-08-30T18:36:38+5:30

गुंतवणुकीवर अधिक रकमेचा मोबदला देण्याचे आमिष दाखवून पिंपरीतील ओमिशा चिट फंड कंपनीच्या संचालकानी एकाची ८ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.  

Crimes registred Against Omisha Chit Fund Company in Pimpri | पिंपरीतील ओमिशा चिट फंड कंपनीविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा

पिंपरीतील ओमिशा चिट फंड कंपनीविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा

Next
ठळक मुद्देकंपनीच्या सहा संचालकांवर  पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी : गुंतवणुकीवर अधिक रकमेचा मोबदला देण्याचे आमिष दाखवून पिंपरीतील ओमिशा चिट फंड कंपनीच्या संचालकानी एकाची ८ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.  कंपनीच्या सहा संचालकांवर  पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामचंद्र बाळु चांदारे (वय ४६, रा. जनवाडी, पुणे) यांनी फसवणूक प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ओमिशा चिट फंड कंपनीचे संचालक मानसिंग शंकर घोरपडे (वय ४०, रा. ऐश्वर्य को.आॅपरेटीव हौसिंग सोसायटी चिंचवड, मु.रा. विटा, सांगली), कैलास परब (वय ५५, रा. कुमार प्रेसिडेन्सी, कोरेगाव पार्क), सुशिलकुमार सुमतीलाल संघवी (वय ४३, रा. संघवी निवास, निगडी), विकास मुक्ताजी नाणेकर (वय ४५, धृव अर्पाटमेंट, प्राधिकरण, निगडी), दत्तात्रय महादेव टकले (वय ५९, रा. सेक्टर २६, आदित्य बंगला, निगडी) आणि योगेश भोसले (वय ३०, रा. विटा, खानापुर, सांगली) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१२ ते २०१५ या कालावधीत गुंतवणूक केली. त्यात फसवणूक झाल्याचे रामचंद्र चांदारे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. पिंपरीतील कमला क्रॉसरोड येथील इमारतीतून  चिटफंडचा कारभार केला जात होता ओमिशा चिट फंड कंपनीच्या संचालक मंडळ आणि अध्यक्ष यांनी जादा पैशांचे आमिष दाखवून विविध टप्प्यांत तब्बल ७ लाख पाच हजार रुपये भरण्यास सांगितले. मात्र काही वर्ष उलटून देखील चांदारे यांना लाभांसह ८ लाख २५ हजार रुपये परत देण्यात आले नाही. चांदारे यांनी वेळोवेळी पाठपुरवा केला. त्यांना परतावा मिळाला नाही. यामुळे  त्यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात ओमिशा चिट फंड कंपनीचे संचालक मंडळ आणि अध्यक्ष यांच्या विरोधात  फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी या सर्वांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Crimes registred Against Omisha Chit Fund Company in Pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.