कंपनीमालकासह पर्यवेक्षकावर गुन्हा

By admin | Published: May 13, 2017 04:45 AM2017-05-13T04:45:32+5:302017-05-13T04:45:32+5:30

कंपनीत मशिनवर काम करीत असताना कामगाराच्या हाताची तीन बोटे मशिनमध्ये सापडून गंभीर दुखापत झाली. घटनेस कारणीभूत

Criminal offender with the company owner | कंपनीमालकासह पर्यवेक्षकावर गुन्हा

कंपनीमालकासह पर्यवेक्षकावर गुन्हा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : कंपनीत मशिनवर काम करीत असताना कामगाराच्या हाताची तीन बोटे मशिनमध्ये सापडून गंभीर दुखापत झाली. घटनेस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कंपनीमालकासह पर्यवेक्षकावर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चिंचवड एमआयडीसीतील जयश्री स्वामी समर्थ इंजि. प्रा. लि. या कंपनीत बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.
भरत जंगबादूर बिस्ट (वय ३५, रा. वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड) असे गंभीर दुखापत झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी कंपनीचे मालक प्रशांत रंगनाथ गोडगे (वय ३१, रा. निगडी, प्राधिकरण) व पर्यवेक्षक सचिन नंदू पोकळे (वय २४, रा. एमआयडीसी, चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरत बिस्ट हे कंपनीमध्ये प्रेस आॅपरेटर म्हणून काम करतात. या कंपनीतील सतत बंद पडणारी प्रेस मशिन ही कंपनी मालक व पर्यवेक्षक यांच्या सांगण्यावरून बिस्ट यांनी चालविली. दरम्यान, बिस्ट यांच्या उजव्या हाताची बोटे मशिनमध्ये सापडून त्यांना गंभीर दुखापत झाली.
दहशत माजविल्याप्रकरणी गुन्हा
तलवार, कोयत्याने तरुणाला मारहाण करीत दहशत माजविल्याप्रकरणी दोघांवर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास चिंचवड, आनंदनगर येथे घडली. बालाजी शिंदे (वय २२, रा. दत्तनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. अमर चव्हाण, किंंच्या शिरसाठ व इतर दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी दहशत माजविण्याच्या उद्देशाने शिंदे यांना शिवीगाळ करीत हाताने तसेच उलट्या तलवारीने हातावर, पायावर, पाठीवर व कोयत्याने डोक्यात मारहाण केली.

Web Title: Criminal offender with the company owner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.