आधार कार्डसाठी पैसे घेणाºयांवर फौजदारी, चार आॅपरेटर्सना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 02:01 AM2017-12-10T02:01:45+5:302017-12-10T02:02:00+5:30

आधार केंद्रांवर येणा-या नागरिकांकडून पैसे उकळल्यास फौजदारी स्वरुपाची कारवाई केली जाणार आहे. नुकतीच चाकण येथे आधार केंद्रांवर अचानक धाड मारून पैसे घेणा-या चार आॅपरेटर्सना अटक करण्यात आल्याची माहिती

 Criminalization of money for Aadhar cards, four operators arrested | आधार कार्डसाठी पैसे घेणाºयांवर फौजदारी, चार आॅपरेटर्सना अटक

आधार कार्डसाठी पैसे घेणाºयांवर फौजदारी, चार आॅपरेटर्सना अटक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आधार केंद्रांवर येणा-या नागरिकांकडून पैसे उकळल्यास फौजदारी स्वरुपाची कारवाई केली जाणार आहे. नुकतीच चाकण येथे आधार केंद्रांवर अचानक धाड मारून पैसे घेणा-या चार आॅपरेटर्सना अटक करण्यात आल्याची माहिती तहसीलदार विकास भालेराव यांनी दिली.
दरम्यान, पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यामध्ये आजमितीस १९६ केंद्रे सुरू असून नवीन आधार कार्ड काढण्यासाठी येणाºयांची संख्या २० टक्के, तर दुरुस्तीसाठी येणाºयांची संख्या ८० टक्के असल्याचेही त्यांनी सांगितले. पुणे शहरामध्ये ८४, पिंपरी चिंचवडमध्ये ४९, जिल्ह्यात ६३ केंद्रे सुरू आहेत. या ठिकाणी आधार नोंदणी व दुरुस्तीची कामे केली जात आहेत. पुणे शहरामध्ये शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये १७ ठिकाणी, क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ०६ ठिकाणी, विविध बँकांच्या १० शाखांमध्ये, तर बीएसएनएल आणि पोस्ट कार्यालयांमध्ये १० ठिकाणी ही सेवा देण्यात येत आहे. महाआॅनलाइन आणि महा-ई सेवा केंद्रांमार्फत ४० ठिकाणी ही सेवा सुरू आहे.
सकाळी दहा ते सहा या वेळेत दिवसभरात प्रत्येक केंद्रांवर साधारणपणे २० ते २५ आधारची नोंदणी केली जाते.
पालिका क्षेत्रीय कार्यालयांमध्ये हे कीट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या दुरुस्तीसाठी फोटो ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा सोबत असणे आवश्यक आहे. त्या ठिकाणी नागरिकांच्या हातांच्या अंगठ्याचा ठसाही घेतला जाणार आहे.
काही ज्येष्ठ नागरिकांच्या हातांचे ठसे किंवा डोळ्यांच्या बुबुळांचे स्कॅनिंग होत नाही. अशा ज्येष्ठांची यादी करून त्यांची नोंद करण्यात येणार आहे. त्यांना जिल्हा प्रशासनाने पावती दिल्यास त्यांच्याशी युआयडीमार्फत संपर्क साधण्यात येणार आहे. त्यांच्या घरी जाऊन विशेष प्रक्रियेद्वारे त्यांचे आधारकार्ड काढून दिले जाणार असल्याचेही भालेराव यांनी
सांगितले.
शासनाकडे खासगी आॅपरेटर्सना काम करून देण्यासाठी त्यांची यादी पाठविली होती. सोमवारपर्यंत ५० जणांची ही यादी निश्चित होऊन प्रशासनाला मिळणार आहे. या सर्वांनी शासकीय इमारतींमध्ये काम करण्यास संमती दर्शविली असल्याने आणखी केंद्र वाढू शकणार आहेत. या सर्वांना शहरातील क्षेत्रीय कार्यालयांमध्ये नेमण्यात येणार आहे.
दरम्यान आधार कार्ड वेळेवर मिळत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यांनी आधार कार्ड वेळेत मिळावे यासाठी अनेक नागरिक हेलपाटे मारत आहेत. परंतु प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्याचा त्रास नागरिकांना होत आहे.

आधार केंद्रांवर येणाºया नागरिकांमध्ये सुमारे ८० टक्के नागरिक हे माहिती अद्ययावत करण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी येत आहेत. हे काम अवघ्या पाच मिनिटांत करणारी ५० अपडेट्स क्लार्इंट लाइफ (यूसीएल) कीट येत्या दोन ते तीन दिवसांत प्रशासनाकडे येणार आहे. आजमितीस १९६ केंद्र सुरू असून नवीन आधारकार्ड काढण्यासाठी येणाºयांची संख्या २० टक्के, तर दुरुस्तीसाठी येणाºयांची संख्या ८० टक्के असल्याचेही तहसीलदार विकास भालेराव यांनी सांगितले.

Web Title:  Criminalization of money for Aadhar cards, four operators arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.