By admin | Published: February 8, 2017 11:28 PM2017-02-08T23:28:46+5:302017-02-08T23:28:46+5:30
कोट्यधीश उमेदवार ८५ टक्के
Next
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक २१ फेब्रुवारीला होत आहे. या निवडणूकीत उभे राहिलेले ८५ टक्के उमेदवार कोट्याधिश आहेत. तर उर्वरित उमेदवार लक्षाधिश आहेत. जमीनीला सोन्याचा भाव आल्याने प्रत्येकाच्या घरात अलिशान मोटारी आणि जडजवाहिर असल्याचे त्यांनी निवडणूकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून दिसून येते.
महापालिकेची निवडणूक लढविणाºया उमेदवारांना राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने निवडणूकीचा अर्ज सादर करताना स्थावर आणि जंगम मालमत्तचे विवरण देणे बंधनकारक असते. त्यात यावर्षीपासून उमेदवाराबरोबरच कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न सादर करणे अनिवार्य होते. त्यामुळे घरातील मुळ पुरूष, त्याची पत्नी मुले यांचेही एकत्रित उत्पन्न अनेक उमेदवारांनी सादर केले आहे. त्यात जंगम मालमत्तेत बँक खाती, सेव्हींग करंट खाते, ठेवी, बंधपत्रे यांचा समावेश आहे. तर स्थावर मालमत्तेत जमीन, वडीलोपार्जित जमीन, सदनिका, दुकाने यांचा समावेश आहे. त्याचबरोबर सोने, जडजवाहीर, वाहने यांचाही उल्लेख उमेदवारांनी केलेला आहे. तर उमेदवारांवर किती कर्ज अशा सर्वबाबींचे विवरण प्रतिज्ञापत्रात केले आहे. या निवडणूकीत उभे राहिलेले ८५ टक्के उमेदवार कोट्याधिश आहेत. तर उर्वरित चौदा टक्के उमेदवार हे उमेदवार लक्षाधिश आहेत. उर्वरित उमेदवारांचे उत्पन्न लाखांच्या आत आहे. जमीनीला सोन्याचा भाव आल्याने प्रत्येकाच्या घरात अलिशान मोटारी आणि जडजवाहिर असल्याचे त्यांनी निवडणूकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून दिसून येते. महापालिका निवडणूकीसाठी १२८ जागांसाठी १२३८ अर्जांपैकी ४८० जणांनी माघार घेतल्याने ७५८ उमेदवार रिंगणात शिल्लक राहिले आहेत. त्यात भाजपा, राष्टÑवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे, काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मालमत्तचे विवरण दिले आहे.(
भारतीय जनता पार्टी
भाजपाचे नितीन काळजे यांच्याकडे जंगम मालमत्ता ४.३० लाख, ३७.८६ लाख स्थावर मालमत्ता, अशी एकुण ४१ लाख मालमत्ता असून त्यांच्याकडे ३४ लाखांच्या मोटारी असून कर्ज ३.८९ लाख एवढे आहे. सरिता साने यांचे वार्षिक उत्पन्न २० लाख असून ३.७ कोटींची जंगम आणि ५ .७७ कोटींची स्थावर अशी एकुण ८.१९ कोटींची मालमत्ता आहे. त्यांच्याकडे ४७ लाखांच्या मोटारी आहेत. तर छत्तीस लाखांचे कर्ज आहे. बाळासाहेब ओव्हाळ यांचे वार्षिक उत्पन्न ७.५ लाख असून जंगम मालमत्ता ३६ लाख आणि स्थावर मालमत्ता ४ कोटी अश्ी एकुण ४.३९ कोटींची मालमत्ता आहे. कर्ज नाही. बाळासाहेब तरस यांचे वार्षिक उत्पन्न ४८ लाख असून स्थावर मालमत्ता २४ लाख असून जंगम मालमत्ता ७.३७ कोटी अशी एकुण ७.६१ कोटी उत्पन्न आहे. त्यांच्यावर कर्ज नाही. राजेंद्र गावडे यांचे वार्षिक उत्पन्न ९५ लाख असून जंगम मालमत्ता ७५ लाख, स्थावर ७.८ कोटी अशी एकुण ७.६० कोटींची मालमत्ता असून त्यांच्याकडे ४१ लाखांची वाहने आहे. ३.३१ कोटींचे कर्ज आहे. संदीप वाघेरे यांची जंगम मालमत्ता ७.६९ कोटी आणि स्थावर मालमत्ता ७९.७५ कोटी अशी एकुण ८७.४४ कोटींची मालमत्ता आहे. त्यांच्याकडे ३० लाखांचे सोने आणि १.५० कोटींची वाहने आणि त्यांच्यावर ८.५५ कोटींचे कर्ज आहे. धनंजय काळभोर यांच्याकडे जंगम मालमत्ता २.१८ कोटी असून स्थावर मालमत्ता १४.७७ कोटी अशी एकुण १६.९६ कोटी मालमत्ता आहे. त्यांच्याकडे ११ लाखांचे सोने ८८ लाखांची वाहने आणि ५० लाखांचे कर्ज आहे. नामदेव ढाके यांचे वार्षिक उत्पन्न १२ लाख असून १ कोटी जंगम आणि ८४ लाख स्थावर मालमत्ता असून एकुण १.८९ कोटींची मालमत्ता आहे. त्यांच्याकडे दहा १० लाखांचे सोने ५० लाखांची वाले आहे. ३३ लाखांचे कर्ज आहे. राजेंद्र किसन लांडगे यांचे एकुण उत्पन्न ९.११ लाख असून जंगम मालमत्ता १.३२ कोटी स्थावर मालमत्ता १.०५ कोटी अशी एकुण २ कोटी ३७ ला असून त्यांच्याकडे ३६ लाखांची वाहने असून १६.३० लाखांचे कर्ज आहे. नितीन लांडगे यांचे वार्षिक उत्पन्न ६.२४ लाख असून जंगम मालमत्ता ५०.८० लाख, स्थावर मालमत्ता ३.६५ कोटी अशी एकुण ४.१६ कोटींची मालमत्ता आहे. तर दहा लाखांचे सोने, २५ लाखांच्या मोटारी आणि त्यांच्यावर ७.८८ लाखांचे कर्ज आहे. सतीश दरेकर यांचे वार्षिक उत्पन्न ६४ लाख असून जंगम मालमत्ता १.१८ कोटी, स्थावर मालमत्ता २७ कोटी अशी एकुण २८.९९ कोटी मालम्ता आहे. ३१ लाखांचे कर्ज आहे. माया बारणे यांचे वार्षिक उत्पन्न ७.९८ लाख असून जंगम मालमत्ता ९१ लाख आणि स्थरावर मालमत्ता ११.५७ कोटी अशी एकुण १२.४५ कोटींची मालमत्ता आहे. त्यांच्यावर ८२ लाखांचे कर्ज आहे. विशाल वाकडकर यांचे वार्षिक उत्पन्न ३३ लाख असून जंगम मालमत्ताा सव्वाचार कोटी, स्थावर मालमत्ता २१ कोटी अशी एकुण २५.७८ कोटी मालमत्ता आहे.
राष्टÑवादी काँग्रेस पक्ष
राष्टवादीचे दत्तात्रय साने यांच्याकडे जंगम मालमत्ता १ कोटी ३६ लाख, स्थावर मालमत्ता २० कोटी ९२ लाख अशी एकुण २१ कोटी ९६ लाख असून ६७ लाखांच्या मोटारी ११.९८ लाखांचे कर्ज त्यांच्यावर आहे. विनया तापकीर यांचे वार्षिक उत्पन्न ४.६४ लाख असून जंगम मालमत्ता ९६ लाख आणि स्थावर मालमत्ता २७.३० लाख अशी एकुण १.२३ कोटींची मालमत्ता असून त्यांच्याकडे सोने १० लाखांचे असून २.३५ लाखांचे कर्ज आहे. संजय वाबळे यांचे वार्षिक उत्पन्न १ कोटी असून जंगम मालमत्ता १.५५ कोटी तर स्थावर मालमत्ता १२ कोटी १२ लाख अशी एकुण १३.६७ कोटी १७ लाखांची मालमत्ता आहे. त्यांच्याकडे ८९ लाखांची वाहने असून ४.४५ कोटी कर्ज आहे. विक्रांत लांडे यांचे वार्षिक उत्पन्न ७२.५६ लाख असून जंगम मालमत्ता ६.६८ कोटी आणि स्थावर मालमत्ता ३६.७० लाख अशी एकुण ४३.३८ कोटींची मालमत्ता आहे. तर १२ लाखांचे सोने आणि २० लाखाची वाहने आहेत. तर १८.६७ लाखांचे कर्ज त्यांच्यावर आहे. जालिंदर शिंदे यांचे वार्षिक उत्पन्न ५.६८ लाख असून जंगम मालमत्ता १७.१८ लाख आणि स्थावर मालमत्ता १.९५ कोटी अशी एकुण २.१२ कोटी असून ६.०० लाखांचे सोने असून ७ लाखांची वाहने त्यांच्याकडे असून २ लाखांचे कर्ज त्यांच्यावर आहे. प्रतिभा भालेराव यांचे वार्षिक उत्पन्न ५.१५ लाख असून जंगम मालमत्ता ७७ लाख, स्थावर मालमत्ता १५ लाख अशी एकण ७८ लाख असे उत्पन्न आहे. त्यांच्याकडे ३.५ लाखांचे सोने आहे. कर्ज आणि वाहने नाहीत. आर. एस. कुमार यांचे वार्षिक उत्पन्न १०.१९ लाख, स्थावर ५८ लाख जंगम ६० लाख अशी १.१८ कोटी एकुण उत्पन्न आहे. त्यांच्याकडे १२ लाखांचे सोने आहे. १५ लाखांची वाहने, ११ लाखांचे कर्ज आहे. शरद मिसाळ यांचे वार्षिक उत्पन्न २२ लाख असून जंगम मालमत्ता १.८२ कोटी आणि स्थावर मालमत्ता १.१४ कोटी अशी एकुण २.९७ कोटी मालमत्ता आहे. तर त्यांच्याकडे १० लाखांची वाहने आहेत. २३ लाखांचे कर्ज आहे. मोरेश्वर भोंडवे यांचे वार्षिक उत्पन्न २७ लाख असून जंगम मालमत्ता ५२ लाख असून स्थावर मालमत्ता १ कोटी अशी एकुण १०.५२ लाख उत्पन्न आहे. त्यांच्याकडे ४.५ लाखांचे सोने कर्ज नाही. भाऊसाहेब भोईर यांचे वार्षिक उत्पन्न ३४ लाख असून जंगम मालमत्ता ३.५१ कोटी, जंगम मालमत्ता २८ कोटी अशी एकुण ३२.३० कोटींची मालमत्ता आहे. त्यांच्याकडे ३० लाखांचे सोने आहे. तर २.३० कोटींची वाहने आहेत. ८१ लाखांचे कर्ज आहे. अपर्णा डोके यांचे वार्षिक उत्पन्न ७.७३ लाख असून जंगम मालमत्ता ५४ लाख, २.४९ कोटी जंगम अशी एकुण ३ कोटींची मालमत्ता आहे. त्यांच्यावर ७ लाख कर्ज आहे. विजय गावडे यांचे वार्षिक उत्पन्न ८.३६ लाख असून जंगम३.९७ कोटी अशी एकुण ३.९७ कोटींची मालमत्ता आहे. तर १६ लाखांचे सोन आहे. त्यांच्यावर कर्ज नाही.शोभा वाल्हेकर यांचे वार्षिक उत्पन्न ५ लाख असून जंगम मालमत्ता २९ लाख, स्थावर १७ लाख अशी एकुण २ कोटींची मालमत्ता आहे. त्यांच्यावर ३७ लाखांचे कर्ज आहे. प्रभाकर वाघेरे यांचे वार्षिक उत्पन्न १३ लाख असून जंगम मालमत्ता २८ लाख, स्थावर मालमत्ता ३.७२ कोटी असे एकुण ४.१९ कोटींची मालमत्ता आहे. त्यांच्यावर ६० लाखांचे कर्ज आहे.