Pimpri Chinchwad: विदेशातून साखर निर्यातीचे आमिष दाखवून १.३० कोटींना गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 12:09 PM2023-06-22T12:09:02+5:302023-06-22T12:09:33+5:30
निगडी प्राधिकरण येथे हा गुन्हा घडला...
पिंपरी : परदेशातून वस्तू आयात निर्यात करण्याचा व्यवसाय आहे. असं सांगून एक कोटी ३० लाखांची फसवणूक झाली. निगडी प्राधिकरण येथे हा गुन्हा घडला. हा गुन्हा १ मे २०२१ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधित घडला.
जेकब जॉर्ज याने कंपनीकरिता साखर अपुरी पडत असल्याचे सांगितले. तसेच माझा मित्र सतनाम सिंग हा पंजाबमधून साखर निर्यात करतो, त्याचबरोबर त्याची पासकॉन ॲग्रो नावाची कंपनी आहे. साखर निर्यातीचा व्यवसाय असल्याने तुम्हीही साखर मागवा असं फिर्यादीला सांगितले. २६०० टन साखरेचे कोटेशन दाखवून अमेरिकन डॉलरनुसार ११ लाख ९६ हजार, भारतीय किमतीनुसार ८ कोटी ९९ लाख ९९ हजारांचे कोटेशन दाखवले. या रकमेच्या २० टक्के रक्कम १ कोटी ८० लाख कंपनीला द्यावे लागेल. यावरून फिर्यादी यांनी त्यांच्या पॉस्कॉन ॲग्रो कंपनीच्या अकाऊंटला १ कोटी ८० लाख रुपये पाठवले. आरोपींनी ठरलेल्या वेळेत साखर न पाठवल्याने फिर्यादी यांनी साखर अथवा पैशांची मागणी केली. तेव्हा दोन्ही आरोपींनी पाठवलेल्या रकमेपैकी ५० लाख रुपये फिर्यादीच्या अकाऊंटला पाठवले. त्यानंतर वेळोवेळी संपर्क करूनही पैसे दिले नाही. फिर्यादी मनोहर आबुराव दगडे (वय ४९) यांनी १ कोटी ३० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची फिर्याद दिली.
आरोपी जेकब जॉर्ज,( वय ६३ मयूर विहार फेज-२ दिल्ली) व सतनाम सिंग, (वय ५८ कमलपूर होशियारपूर पंजाब) या दोन आरोपींवर निगडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला.