स्थायी समितीची कोटीच्या कोटी उड्डाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 06:27 AM2018-02-21T06:27:25+5:302018-02-21T06:27:28+5:30
महापालिका स्थायी समितीची कोटीच्या कोटी उड्डाणे सुरूच आहेत. स्थायी समितीच्या बुधवारी होणाºया सभेसमोर तब्बल २५० कोटींची विकासकामे मंजुरीसाठी ठेवण्यात आली आहेत.
पिंपरी : महापालिका स्थायी समितीची कोटीच्या कोटी उड्डाणे सुरूच आहेत. स्थायी समितीच्या बुधवारी होणाºया सभेसमोर तब्बल २५० कोटींची विकासकामे मंजुरीसाठी ठेवण्यात आली आहेत. त्यामध्ये रस्ते विकासासाठी १२५ कोटींची कामे आहेत. याशिवाय अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी ५६ कोटी, कचरा गोळा करण्यासाठी ५६ कोटी, चिखलीतील घरकुल प्रकल्पातील आरक्षणे विकसित करण्यासाठी १० कोटी व भाडेतत्त्वावरील हायड्रॉलिक लॅडरसाठी दर वर्षी ८ कोटी रुपये या कामांचा समावेश आहे.
रस्त्यांच्या कामांसाठी १२४ कोटी ३१ लाख पुणे - नाशिक महामार्गावर पुणे-आळंदी रस्ता विकसित करण्यासाठी ५० कोटी ९४ लाख, डुडुळगाव विकास आराखड्यातील १८ मीटर रस्त्यासाठी २३ कोटी ९३ लाख रुपये, चिंचवड - बिजलीनगर येथील भुयारी मार्गासाठी १३ कोटी २१ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. देहू कमान ते झेंडे मळा रस्त्यांचे मजबुतीकरणासाठी १२ कोटी ५५ लाख, चºहोलीत १८ मीटर रस्ता विकसित करण्यासाठी ९ कोटी ७३ लाख, सब-वे बांधण्यासाठी ८ कोटी ५९ लाख रुपये खर्च होणार आहे. ग प्रभागात डांबरीकरण करण्यासाठी ४ कोटी ८ लाख, घरोघरचा कचरा गोळा करण्यासाठी दोन ठेकेदारांना प्रतिवर्षी ५६ कोटी रूपये देण्यात येणार आहेत.