रोषणाईने खेचली आयटीयन्सची गर्दी
By admin | Published: September 11, 2016 12:59 AM2016-09-11T00:59:06+5:302016-09-11T00:59:06+5:30
रहाटणी, हिंजवडी परिसरात यंदा अनेक गणेश मंडळांनी सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक देखाव्यांवर भर दिला आहे. स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबळी असे देखावे साकारले आहेत.
हिंजवडी : रहाटणी, हिंजवडी परिसरात यंदा अनेक गणेश मंडळांनी सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक देखाव्यांवर भर दिला आहे. स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबळी असे देखावे साकारले आहेत, तर काही मंडळांनी आकर्षक सजावट, रोषणाई, समाजप्रबोधनाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर दिला आहे. देखावे पाहण्यासाठी परिसरामध्ये गर्दी होत आहे. अनेक वेळा मंडळाच्या कार्यकर्त्यांना गर्दी आवारण्यासाठी नाकी नऊ येत आहेत.
हिंजवडी : आयटीनगरी हिंजवडी परिसरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी रोषणाईसह फुलांची सजावट व करमणुकींच्या कार्यक्रमावर भर दिला आहे. काही वर्षांपासून गणेश मंडळांमध्ये कमालीची स्पर्धा असून, मंडळांची संख्याही वाढत असल्याने देखावे पाहण्यासाठीदेखील गर्दी होत आहे.
पंचरत्न मंडळाने ऐतिहासिक व पौराणिक देखाव्यांची पंरपरा कायम ठेवली आहे. शिवतेज मित्र मंडळाने रोषणाईसह मंदिर उभारले असून, किरण जांभूळकर मंडळाचे अध्यक्ष आहेत. वेताळबुआ परिसरातील शिवशक्ती मित्र मंडळाने आकर्षक सजावट केली असून, शुभम साखरे मंडळाचे अध्यक्ष आहेत. आदर्शनगरमधील आदर्श मित्र मंडळाने दररोज सांस्कृतिक व मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवले आहेत. माण रो़डला असलेल्या संत तुकाराम गणेशोत्सव मंडळाने रोषणाई केली आहे. क्रांती मित्र मंडळाने आकर्षक सजावट केली आहे. हिंजवडीच्या मुख्य चौकातील छत्रपती शिवाजी तरुण मंडळाने राजस्थानच्या धर्तीवरील मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. अरुण साखरे मंडळाचे अध्यक्ष असून, अॅड. शिवाजी जांभूळकर संस्थापक आहेत. हिंजवडी गावठाणातील जय भवानी मित्र मंडळाने सांस्कृतिक व मनोरंजनात्मक उपक्रमांची परंपरा कायम ठेवत बालजत्रेचे आयोजन केले आहे. घसरगुंडी, पाळणा, झोका, विदूषक, मौत का कुआ अशी चित्तथरारक प्रात्यक्षिके व वेगवेगळ्या खेळांचा आनंद लुटता येत आहे. शिवसेनेच्या युवा सेनेचे तालुकाप्रमुख उमेश साखरे मंडळाचे अध्यक्ष आहेत.
पुनावळे माळवाडी येथील अमर तरुण मंडळाने यंदा रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत शनिवार वाड्याची प्रतिकृती उभारली असून, दररोज विविध सांस्कृतिक व मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. (वार्ताहर)