गर्दी, गोंधळ ओसरला
By admin | Published: November 16, 2016 02:43 AM2016-11-16T02:43:35+5:302016-11-16T02:43:35+5:30
नोटा बदलण्यासाठी आणि खात्यात पैसे भरण्यासाठी नागरिकांनी नी मंगळवारीही बँकेच्या प्रवेशाद्वाराजवळ गर्दी केल्याचे पाहायला मिळाले़ परंतु
पिंपरी : नोटा बदलण्यासाठी आणि खात्यात पैसे भरण्यासाठी नागरिकांनी नी मंगळवारीही बँकेच्या प्रवेशाद्वाराजवळ गर्दी केल्याचे पाहायला मिळाले़ परंतु गेल्या चार दिवसांच्या तुलनेत बहुतांश बँकांच्या क्षेत्रीय कार्यालयांकडून पुरेशी रक्कम जमा झाल्यामुळे कोणत्याही ठिकाणी गोंधळ झाला नाही.
सोमवारी बँका बंद असल्यामुळे बहुतांश बँकाच्या एटीएममधील पैसे त्याच दिवशी दुपारपर्यंत संपले. त्यामुळे संपल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती़ मात्र, आज सकाळपासून नागरिकांनी
बँकेसमोर गर्दी केली. एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर बँकेत गर्दी झाल्यामुळे काम करताना अडचणी निर्माण होत आहेत़ बँकांतून पैसे काढल्यानंतर दूध, रिक्षा, पेपर, भाजीपाला, किराणा माल भरण्यासाठी गृहिणींकडून दोन हजारांची नोट व्यावसायिकांच्या हातात सोपविली जात आहे़ त्यामुळे आता पैसे मिळाल्यानंतर सुट्या पैशांसाठी नागरिकांना कसरत करावी लागत आहे़ मात्र, बँक व्यवस्थापक आणि खातेदारांमध्ये आज समन्वय पाहायला मिळाला.
बँकांकडून व्यवस्था
शहरातील काही बँकांनी खातेदारांच्या सोयीसाठी बँकाबाहेर मंडप टाकला होता़ तसेच पिण्याचे पाणी, दिव्यांग-ज्येष्ठांना प्राधान्य, खातेदारांना मार्गदर्शन यामुळे खातेदारांमध्ये शांतता दिसून येत होती.सोमवारी सुटी असल्याने पिंपरी, चिंचवडगाव, भोसरी, निगडी, आकुर्डी, दापोडी, बोपोडी परिसरातील बॅंकांमध्ये मंगळवारी नागरिकांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या़
अनेक खातेदारांनी पहाटे सहापासून रांग लावल होती. बहुतांश बँकांच्या शाखेत महिलांची गर्दी लक्षणीय होती़पैसे भरण्यासाठी इंग्रजीमधील फ ॉर्म भरावा लागत असल्यामुळे खातेदारांचा गोंधळ निर्माण होत होता़ (प्रतिनिधी)