वाहन खरेदीसाठी ‘आॅफर’मुळे गर्दी
By admin | Published: March 31, 2017 02:53 AM2017-03-31T02:53:15+5:302017-03-31T02:53:15+5:30
बीएस-चार (भारत स्टेज-फोर) उत्सर्जन निकषांचे पालन न करणाऱ्या वाहनांची विक्री आणि नोंदणीवर एक एप्रिलपासून बंदी
पिंपरी : बीएस-चार (भारत स्टेज-फोर) उत्सर्जन निकषांचे पालन न करणाऱ्या वाहनांची विक्री आणि नोंदणीवर एक एप्रिलपासून बंदी घालण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर स्टॉक असलेल्या बीएस-३ गाड्यांची लवकरात लवकर विक्री करण्यासाठी दुचाकी डीलर्सकडून विविध ‘आॅफर’ दिल्या जात आहेत. त्यामुळे दुचाकी विकत घेण्याची इच्छा असणाऱ्या ग्राहकांना फायदा होणार आहे. मात्र, यासाठी गुरुवार आणि शुक्रवार असे दोनच दिवस हाती असल्याने शहरातील दुचाकी शोरूममध्ये ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती.
बीएस-३ गाड्यांची नोंदणी ३१ मार्चपर्यंत करणे गरजेचे आहे. त्यामुळे डीलरकडून या गाड्यांची विक्री होण्यासाठी विविध आॅफर दिल्या जात आहेत. ही माहिती मिळताच अनेकांनी या आॅफरचा लाभ घेण्यासाठी
तयारी सुरू केली. कोणती दुचाकी घ्यायची याचे नियोजनही केले. ज्यांच्याकडे अगोदर दुचाकी आहे. त्यांनीही अधिकची दुचाकी घेण्यास पसंती दिली. (प्रतिनिधी)